४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी, चिंचवड, उर्से, शिक्रापूर भागात वीजपुरवठा खंडित

By नितीन चौधरी | Published: July 8, 2023 12:58 PM2023-07-08T12:58:27+5:302023-07-08T12:59:40+5:30

पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे...

Fault in 400 KV Extra High Voltage Power Lines; Power supply interrupted in Pimpri, Chinchwad, Urse, Shikrapur areas | ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी, चिंचवड, उर्से, शिक्रापूर भागात वीजपुरवठा खंडित

४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी, चिंचवड, उर्से, शिक्रापूर भागात वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

पुणे : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दरम्यान विजेची मागणी कमी असल्याने भार व्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. तर काही भागात नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन सुरू आहे.

पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव ४०० केव्हीच्या अतिउच्चदाब चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी ९.०३ वाजता तुटली. त्यामुळे सुमारे ३५५ मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले. परिणामी पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ आदी परिसरातील वीजपुरवठा बंद पडला.

पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महापारेषण व महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.

Web Title: Fault in 400 KV Extra High Voltage Power Lines; Power supply interrupted in Pimpri, Chinchwad, Urse, Shikrapur areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.