मॉन्सून वाटचालीसाठी अनुकूल स्थिती
By admin | Published: May 24, 2017 04:11 AM2017-05-24T04:11:09+5:302017-05-24T04:11:09+5:30
मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच सायंकाळच्या सुमारास हलक्याशा पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे मान्सून वेळेवर येण्याची चिन्हे आहेत. आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४६.६ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस अहमनगर येथे नोंदविले गेले.
विदर्भात तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून येत्या २४ मेपर्यंत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. येत्या २५ मे रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून २६ मे रोजी दक्षिण कोकण- गोवा, दक्षिण मध्य- महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात येत्या २६ मेपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहिल.
राज्याच्या प्रमुख शहरांमधील
कमाल तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे : ३८.८, लोहगाव : ३९.२, अहमदनगर : ४०.७ , जळगाव : ४१.२, कोल्हापूर : ३७.८, महाबळेश्वर : ३२.१, नाशिक : ३८.०, सांगली : ३९.५, सातारा : ३८.९, सोलापूर : ४१.९, मुंबई : ३३.७, अलिबाग : ३२.९ , रत्नागिरी : ३४.५, पणजी : ३४.८, औरंगाबाद : ४0.४, परभणी : ४२.८, डहाणू : ३४.३, अकोला : ४३.३, अमरावती : ४१.२, बुलडाणा : ४०.२, ब्रह्मपुरी : ४५.३, चंद्रपूर : ४६.६, गोंदिया : ४३.८, नागपूर : ४४.९, वाशिम : ४१.८, वर्धा : ४४.२, यवतमाळ : ४२.५.