निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो : पवार

By admin | Published: December 25, 2016 04:44 AM2016-12-25T04:44:09+5:302016-12-25T04:44:09+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेच्या महिलांच्या सर्व जागा निवडून आणल्या आहेत. पण निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो, हे दिसून आले आहे, अशा परखड शब्दांत

Fazil confident in elections: Pawar | निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो : पवार

निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो : पवार

Next

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेच्या महिलांच्या सर्व जागा निवडून आणल्या आहेत. पण निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो, हे दिसून आले आहे, अशा परखड शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांना व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने बारामतीचा गड राखण्यात यश मिळवले असले तरी पुणे जिल्ह्यामध्ये मात्र राष्ट्रवादी कुठेही त्यांचा दबदबा राखू शकलेली नाही. येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे वक्तव्य केले. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी नूतन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित ३५ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना या सर्व बाबींचा विचार केला जाईल. एकाच प्रभागात एखादा उमेदवार दीड हजाराच्या फरकाने निवडून येतो. मात्र, दुसरा उमेदवार पराभूत होतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. यंदा बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत काही नवखे चेहरे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले, तर आजी-माजी नगराध्यक्षांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे बारामतीमध्ये बहुमत मिळाले असले तरी संपूर्ण निकालाचे आत्मपरीक्षण करावे लागेल, असे पवार म्हणाले.
बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी आभार मानले. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, वैशाली नागवडे, किरण गुजर, सतीश तावरे, पुरुषोत्तम जगताप, अमर धुमाळ, राहुल वाबळे आदी उपस्थित होते.

यशाने हुरळू नका, खचूनही जाऊ नका...
निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी योग्य प्रकारे भूमिका सभागृहात मांडल्या पाहिजेत. गेल्या महिन्याभरात प्रचार करताना नागरिकांनी मांडलेले प्रश्न, तक्रारी व्यवस्थितपणे सोडविल्या पाहिजेत. लवकरच बारामतीच्या विकासाचा आराखडा बनविण्यासाठी नवनिर्वाचित नगगराध्यक्षा व नगसेवक आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येईल. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, तर चार जागा गेल्याने खचूनदेखील जाऊ नका, असे पवार म्हणाले.

Web Title: Fazil confident in elections: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.