किडक्या बटाट्यांच्या वापरामुळे प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर एफडीएची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:03 PM2019-02-04T21:03:32+5:302019-02-04T21:17:39+5:30

गार्डनच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभाव तसेच किडक्या बटाट्याचा वापर अशा कारणांचा समावेश आहे

FDA action against Garden Vada Pav center due to use of spoile potatoes | किडक्या बटाट्यांच्या वापरामुळे प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर एफडीएची कारवाई 

किडक्या बटाट्यांच्या वापरामुळे प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर एफडीएची कारवाई 

googlenewsNext

पुणे : अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या वापरामुळे अन्न व औषध प्रशासन पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरसह तीन विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. 

               अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६अंतगत तरतुदीनुसार बंधनकारक आहे. या कायद्यात सांगितलेल्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत बागबान रेस्टोरंट, अख्तर केटरर्स आणि गार्डन वडापाव सेंटरचा समावेश आहे. यात कामगारांची अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची अयोग्य साठवणूक, अस्वच्छता, विना परवाना व्यवसाय अशी कारणे देण्यात आली आहेत. यातील गार्डनच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभाव तसेच किडक्या बटाट्याचा वापर अशा कारणांचा समावेश आहे.या ठिकाणी धाडी टाकून संबंधित व्यवसाय धारकांवर कारवाई म्हणून त्यांनी त्यांचा विक्रीचा व्यवसाय तातडीने जनहित व जनआरोग्याच्या कारणास्तव बंद करण्याबाबत आदेश दिल्याचे एफडीएतर्फे सांगण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांच्या पथकाने केली.  

Web Title: FDA action against Garden Vada Pav center due to use of spoile potatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.