ऐन मोसमात बर्फ तपासणीबाबत एफडीए पडली ‘गार’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:00 PM2019-04-15T13:00:11+5:302019-04-15T13:09:32+5:30

एफडीए च्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे गलिच्छ तसेच रोगराईला कारणीभूत ठरणारा बर्फ पुणेकरांच्या पोटात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

FDA gets ' cool ' about inspection of snow | ऐन मोसमात बर्फ तपासणीबाबत एफडीए पडली ‘गार’ 

ऐन मोसमात बर्फ तपासणीबाबत एफडीए पडली ‘गार’ 

ठळक मुद्देबर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी जंतुमुक्त, जागा स्वच्छ असणे आवश्यकनिवडणुकीच्या कामात अडकल्याने पुढील आठवड्यात शहरातल्या बर्फाची तपासणी करणार : एफडीए

पुणे : ज्या मोसमात बर्फाचा सर्वाधिक वापर होतो त्याच उन्हाळयात बर्फाच्या दर्जाची तपासणी करण्यासंदर्भात प्रशासन थंडगार पडल्याचे स्पष्ट झाले आहे. रसवंतीगृहांपासून, विविध हॉटेले, शीतपेयांची दुकाने-हातगाड्या, मंगल कार्यालये आदी सर्वत्र प्रामुख्याने प्यायच्या थंड पाण्यासाठी बर्फांचा वापर सध्या वाढला आहे. मात्र अर्धा उन्हाळा संपला तरी या बर्फाची तपासणी करण्यास अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळ मिळालेला नाही.
एफडीए च्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे गलिच्छ तसेच रोगराईला कारणीभूत ठरणारा बर्फ पुणेकरांच्या पोटात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या कामात अडकल्याने पुढील आठवड्यात शहरातल्या बर्फाची तपासणी करणार असल्याचे एफडीए कडून सांगण्यात येत आहे.   
बर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी जंतुमुक्त, स्वच्छ असणे आवश्यक आहे. बर्फ तयार करण्यासाठी वापरली जाणारी जागाही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शहरात दररोज शेकडो टन  बर्फाची मागणी असते. पुण्यात कोंढवा, हिंगणे, पिंपरी तसेच नांदेड सिटी आदी परिसरातील बर्फ उत्पादकांकडून बर्फाचा पुरवठा केला जातो. उद्योगासाठी वा अन्य कारणासाठीचा अखाद्य बर्फ निळ््या रंगाचा आणि खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ रंगहीन असला पाहिजे, असा नियम सरकारने केला आहे. मात्र या सर्वांची काटेकोर तपासणीच सध्या शहरात होत नाही. 
लिंबू सरबत, कोकम, कैरी पन्हे, उसाचा रस, ताक, लस्सी यासह सर्व प्रकारच्या शीतपेयांमध्ये तसेच मद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बफार्चा वापर होतो. दरवर्षीच्या उन्हाळयात एफडीएकडून बर्फाचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. यंदा या तपासणीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे पुणेकरांच्या पोटात कोणत्या दजार्चा बर्फ  जात आहे, याबद्दलची स्पष्टता नाही.
...

Web Title: FDA gets ' cool ' about inspection of snow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.