सूपप्रकरणी जहाॅंगीर रुग्णालयाच्या कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 08:40 PM2019-05-08T20:40:22+5:302019-05-08T20:45:36+5:30

एफडीएने जहाॅंगीर रुग्णालयाच्या केलेल्या तपासणीत तेथील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे.

FDA inspect jahangir hospital canteen | सूपप्रकरणी जहाॅंगीर रुग्णालयाच्या कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी

सूपप्रकरणी जहाॅंगीर रुग्णालयाच्या कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी

Next

पुणे : जहाॅंगीर रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिलेला देण्यात आलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बाेळे आढळून आले हाेते. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे ( एफडीए) तक्रार केली हाेती. एफडीएने केलेल्या तपासणीत रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळून आली असून याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबराेबर इतर रुग्णालयाच्या कॅन्टीनची देखील तपासणी करण्यात येणार आहे. 

जहाॅंगीर रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला देण्यात आलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बाेळे आढळले हाेते. संबंधित महिलेचे पती महेश सातपुते यांनी याप्रकरणी रुग्णालय प्रशासन, पाेलीस , महापालिकेचा आराेग्य विभाग तसेच एफडीएकडे तक्रार केली हाेती. एफडीएकडे 3 मे ला तक्रार करण्यात आली हाेती. त्यानुसार साेमवारी 6 मे राेजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कॅन्टीनची तपासणी केली. या तपासणीत कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळून आले. 

याबाबत एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी एफडीएकडे तक्रार करणे आवश्यक हाेते. मात्र ही तक्रार उशीरा करण्यात आली. जहाॅंगीर रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळली असून याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याचप्रकारे इतर रुग्णालयाची देखील तपासणी करण्यात येणार आहे. 

Web Title: FDA inspect jahangir hospital canteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.