‘एफडीए’कडून ३५ दुकानदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:16+5:302021-09-15T04:14:16+5:30
प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी त्याचबरोबर भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात ...
प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी त्याचबरोबर भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे. नियमांचे उल्लंघन करून विक्रेत्यांनी जर भेसळीच्या वस्तू विकल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. भेसळ रोखण्यासाठी दिवाळी सणापर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.
मिठाईच्या ‘ट्रे’वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक न टाकणे, कच्चे अन्न पदार्थ व खवा हा परवानाधारक/नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी न करणे, प्रत्येक अन्न व्यावसायिकाने त्यांचे विक्री बिलावर अन्न सुरक्षा व कायदा २००६ अंतर्गत प्राप्त परवाना/नोंदणी क्रमांक नमूद न करणे, अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक न करणे, कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबतची वैद्यकीय तपासणी न करणे, मिठाई ही ८-१० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश न देणे, स्वत:चे आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण न करणे आदी विविध बाबी तपासण्यात आल्या आहेत.
----
३५ दुकानदारांना आम्ही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यापैकी २९ नमुने तपासणीसाठी पाठवलेत. यात ९ दुकानदारांनी प्रॉडक्टवर बेस्ट बिफोरचे डेट टाकली नाही. तपासणी अहवाल आल्यानंतर या जे नोंदणीकृत विक्रेते आहेत. त्यांना एक लाख रूपयांपर्यंत दंड, तर जे नोंदणीकृत नाहीत त्या विक्रेत्यांना दोन लाख रूपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग