एफडीएचे 'तुघलकी' आदेश, पुण्याला ३० किलोमीटरवरील चाकणऐवजी कर्नाटकावरून आणावा लागणार ऑॅक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:21+5:302021-04-24T15:22:18+5:30

एफडीएने पुण्यातील हाॅस्पिटलला चाकण येथून होणारा ऑक्सिजन पुरवठ्याचा कोटा तब्बल १२० टनांनी कमी केला आहे.

FDA orders Tughlaq to bring oxygen from Karnataka to Pune instead of 30 km Chakan | एफडीएचे 'तुघलकी' आदेश, पुण्याला ३० किलोमीटरवरील चाकणऐवजी कर्नाटकावरून आणावा लागणार ऑॅक्सिजन

एफडीएचे 'तुघलकी' आदेश, पुण्याला ३० किलोमीटरवरील चाकणऐवजी कर्नाटकावरून आणावा लागणार ऑॅक्सिजन

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने ऑॅक्सिजनची गरजही मोठी असताना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तुघलकी आदेश काढले आहेत. पुण्यापासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चाकणऐवजी कर्नाटकातील बेल्लारी आणि रायगडमधील तळोजातून ऑॅक्सिजन आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे पुण्याच्या ऑॅक्सिजन पुरवठ्यावर संकट येण्याची भीती आहे.

पुण्यातील विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधानंतरही हा बदल करण्यात आला. शुक्रवारी रात्री अचानक एफडीएने हे आदेश काढले आहेत. शनिवारी सकाळपासून हे नवे आदेश लागू झाले आहेत. आणि त्यानुसार ऑक्सिजनचे वाटप सुरु झाले आहे.

एफडीएने पुण्यातील हाॅस्पिटलला चाकण येथून होणारा ऑक्सिजन पुरवठ्याचा कोटा तब्बल १२० टनांनी कमी केला आहे. हा पुरवठा आता रायगड जिल्ह्यातील तळोजा आणि कर्नाटकातील बेल्लारी येथून होणार आहे. वाहतुकीचे अंतर आणि वेळ वाढून पुण्यात शनिवारपासूनच ऑॅक्सिजन संकट निर्माण होण्याची भीती आहे.

पुण्यात दररोज ३५० ते ३८० टन ऑक्सिजनची मागणी असते. चाकण येथील चार ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून ही गरज भागवली जात होती. मात्र, चाकण येथून पुण्याला होणाऱ्या या पुरवठ्यात बदल करण्यात आला आहे. मात्र, नवीन ठिकाणावरून ऑक्सिजन आणण्यासाठी नव्याने टँकर व्यवस्था करावी लागणार आहे. प्रवासाचा वेळ वाढणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन वितरण पुण्यात शनिवारी विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यात ऑक्सिजन वाहतूक आणि वितरणाची असलेली व्यवस्था एफडीएच्या नव्या आदेशाने बदलली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध डावलून नवीन आदेश

Web Title: FDA orders Tughlaq to bring oxygen from Karnataka to Pune instead of 30 km Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.