गुटखा विक्रीविरोधात एफडीएचे धाडसत्र; पुणे विभागातून १८ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:46 PM2017-11-02T12:46:04+5:302017-11-02T12:52:17+5:30

एफडीएने वाढत्या गुटखा विक्रीला आळा घालण्याच्या दृष्टीने १८ लाख ७८ हजार ७०० रुपये किंमतीचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे.

FDA raids against gutkha sale; Vehicles seized from Pune division with 18 lakh gutkha | गुटखा विक्रीविरोधात एफडीएचे धाडसत्र; पुणे विभागातून १८ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त

गुटखा विक्रीविरोधात एफडीएचे धाडसत्र; पुणे विभागातून १८ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त

Next
ठळक मुद्दे१८ लाख ७८ हजार ७०० रुपये किंमतीचा गुटखा आणि वाहन जप्त एफडीए सहायक आयुक्त अपर्णा भोईटे यांच्यासह विभागातील अधिकार्‍यांनी केली कारवाई

पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) वाढत्या गुटखा विक्रीला आळा घालण्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला विरोधात मोहीम उघडली असून या अंतर्गत १८ लाख ७८ हजार ७०० रुपये किंमतीचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे. 
या मोहिमोंतर्गत येरवड्यातील मे. बिजली ट्रेडर्स येथून ६५ हजार ८८० रुपये किंमतीचा , माताजी जनरल स्टोअर्स खराडी येथून ६ लाख ३८ हजार २८९ रुपये किंमतीचा आणि गणेश सुपर शॉपी खराडी येथून ३ लाख ३५ हजार ३७४ रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला आहे. 
कोथरूड येथे सुजित राजकुमार खिंवसरा या व्यक्तीस टेम्पो क्रमांक एमएच १२ एम व्ही ७५८० या मधून गुटखा, पानमसाला वाहतूक करीत असताना संघटीत गुन्हेगारी विरोधी पथक दक्षिण विभाग, गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. 
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहायक आयुक्त अपर्णा भोईटे यांच्यासह विभागातील अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. कारवाईत चंदननगर पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांच्यासह चेतन गायकवाड, दीपक चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

Web Title: FDA raids against gutkha sale; Vehicles seized from Pune division with 18 lakh gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.