एफडीए चोवीस तास ‘दक्ष’
By admin | Published: November 29, 2014 01:16 AM2014-11-29T01:16:53+5:302014-11-29T01:16:53+5:30
भेसळ आणि काळाबाजार करणा:यांच्या कारवाया प्रामुख्याने रात्रीच चालत असल्याचे लक्षात येते.
Next
विशाल शिर्के ल्ल पुणो
भेसळ आणि काळाबाजार करणा:यांच्या कारवाया प्रामुख्याने रात्रीच चालत असल्याचे लक्षात येते. त्याला अटकाव करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) नागरिकांना 24 तास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबईत राज्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्यात 24 तास अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे केंद्र अगदी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे.
अन्न-औषधांतील भेसळ, त्याचा दर्जा राखला जात नसल्याची अनेक प्रकरणो समोर आली आहेत. खाद्यान्नाला मानकापेक्षा अधिक खाद्यरंग देणो, भाज्या अथवा खाद्यपदार्थ तजेलदार दिसावेत यासाठी त्याला रंग लावणो, असे प्रकार उघडकीस आले आहेत. दुधातील पाण्याची भेसळ तर नित्याचीच झाली आहे. तसेच औषधाचा दर्जा निकृष्ट असणो अथवा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यास बंधने असलेल्या औषधांचीही खुलेआम विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही औषधांचा नशेसाठीही उपयोग करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर एफडीएने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोणत्याही अन्न व औषधातील भेसळीची माहिती देणो सोपे होणार आहे. नव्या सुरू केलेल्या या कक्षात औषध निरीक्षक, अन्न सुरक्षा अधिकारी (एफएसओ), एक लिपिक व शिपाई असे मनुष्यबळ देण्यात आले आहे. कक्षातील दूरध्वनी अथवा एफडीएच्या ई-मेलद्वारे प्राप्त होणा:या तक्रारींची नोंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी तक्रारीसाठी वांद्रे येथील नियंत्रण कक्षाच्या क्22-26592364, 26592365, 26592373 या दूरध्वनी क्रमांकांवर, अथवा औषध विभागाच्या तक्रारींसाठी 23ील्लAूँक्ॅें्र’.ूे वर , तर अन्न विभागासाठीच्या तक्रारींस Aूाँिॅ14ॅें्र’.ूे या ईमेल आयडीवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त, सुट्टीच्या दिवशीही या कार्यालयाचा नागरिकांशी संवाद झाला पाहिजे. या केंद्रात येणा:या सर्व तक्रारींची माहिती संबंधित अधिका:यांना दिली जाणार असून, त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. भविष्यात विभागीय कार्यालयातदेखील असे केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे एफडीएचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.