पाणीपुरीवर एफडीएचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:43 AM2017-08-02T03:43:28+5:302017-08-02T03:43:31+5:30
चटपटीत, चटकदार पाणीपुरी बनतेय कशी याचा कोणीही विचार करीत नाही. अस्वच्छ ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्याने ब-याचदा तरुणांसह लहान मुले आजारी पडतात.
पुणे : चटपटीत, चटकदार पाणीपुरी बनतेय कशी याचा कोणीही विचार करीत नाही. अस्वच्छ ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्याने ब-याचदा तरुणांसह लहान मुले आजारी पडतात. अन्न व औषध प्रशासनाने अस्वच्छ पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून पुणे शहरातील १७ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, तसेच ११ हजार रुपयांच्या पाणीपु-या जप्त केल्या आहेत.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून एफडीएच्या अधिकाºयांनी पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात रस्त्यावर व दुकानातील पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी केली जात आहे. शासकीय परवाना न घेता रस्त्यावर कुठेही, तसेच रस्त्यालगत स्टॉल उभे करून पाणीपुरीची विक्री करणाºया एकूण ४३ स्टॉल्सची तपासणी करण्यात आली आहे. एफडीएच्या अन्नसुरक्षा अधिकाºयांनी स्वच्छता व दुकानात वापरल्या जाणाºया मालाच्या दर्जाची तपासणी केली. त्यात पुणे जिल्ह्यात १७, साता-यातील ४, सांगलीतील ३, सोलापूरमधील ३ आणि कोल्हापुरातील ६ पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २९, ५०० रुपये दंड वसूल
करण्यात आला.
पुरी बनविण्याचे कारखाने अस्वच्छ-
पाणीपुरी हा पदार्थ चटपटीत असला तरी पाणीपुरीसाठी तयार केल्या जाणाºया पुºया नेमक्या कोणत्या ठिकाणी आणि कशा तयार केल्या जातात. याबाबतची माहिती घेण्याचा सर्वसामान्य नागरिक जराही प्रयत्न करीत नाहीत. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एफडीएच्या अधिकाºयांनी पाणीपुरीसाठी पु-या तयार करणाºया ४ कारखान्यांवर छापे टाकले. त्यात जराही स्वच्छता नसलेल्या ठिकाणी पाणीपुºया तयार केल्या जात असल्याचे निदर्शनास आले.
पुण्यातही पाणीपुरी तपासणी मोहीम राबविली जात आहे. पुणे विभागातील एफडीएचे अधिकारी कालिदास शिंदे, गणपत कोकणे, संतोष सावंत, अजित मेहेत्रे, रवींद्र जेट्टे, डी. एम. बांबळे, अविनाश भांडवलकर आदींनी पाणीपुरी तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई केली आहे. त्यात एफडीएचे अधिकारी अरुण धुळे यांनी तब्बल ११ हजार ८०० रुपयांच्या पाणीपुºया जप्त केल्या आहेत.
एफडीएचे सहायक आयुक्त संपत देशमुख म्हणाले, ‘‘प्रामुख्याने इतर राज्यातून पुण्यात आलेल्या व्यक्तींकडून रस्त्यावर कुठेही उभे राहून पाणीपुरीचा व्यवसाय केला जात असल्याचे दिसून येते. तसेच लहान-मोठे स्टॉल उभे करूनही हा व्यवसाय केला जात आहे. मात्र, रस्त्यावरील ठेल्यांवर वाहनाच्या येण्या-जाण्यामुळे पाणीपुरीवर
धूळ उडते. स्वच्छता न राखल्यामुळे त्यावर माशा घोंघावतात. ग्राहकांना पाणीपुरी देण्यासाठी वापरल्या जाणाºया प्लेटस् स्वच्छ धुतल्या जात नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींची तपासणी करून पाणीपुरी विकेत्यांवर कारवाई केली जात आहे.