स्वस्त धान्य दुकानातून कोरोना संक्रमणाची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:34+5:302021-04-20T04:11:34+5:30

पांडुरंग मरगजे धनकवडी : रास्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी होणारी गर्दी आणि नियमाप्रमाणे त्यासाठी अंगठा (थंब) द्यावा लागत असल्याने ...

Fear of corona infection from cheap grain stores | स्वस्त धान्य दुकानातून कोरोना संक्रमणाची भिती

स्वस्त धान्य दुकानातून कोरोना संक्रमणाची भिती

Next

पांडुरंग मरगजे

धनकवडी : रास्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी होणारी गर्दी आणि नियमाप्रमाणे त्यासाठी अंगठा (थंब) द्यावा लागत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. गतवर्षीच्या लाँकडाऊनमध्ये अंगठा न घेता ही सुविधा देण्यात आली होती. ती पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी होत आहे.

‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने संचारबंदी व कडक निर्बंधसह शनिवारी आणि रविवारी विकेंड लाँकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, व्यवसायिक, छोटे व्यापारी या मधील पात्र शिधापत्रिका धारक हे धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात गर्दी करू लागले आहेत. धान्य घेण्यासाठी नागरिकांची रांग लागलेली असते. हे धान्य वितरण करताना पाँस (POS) (पीओएस) मशीनवर अंगठा ठेवून धान्य वितरण करावे लागते. या रांगेत एकाद्यी व्यक्ती कोरोना बाधित असेल तर पीओएस मशीन हे कोरोना संक्रमणाचे निमित्त ठरणार आहे. त्यामुळे दुकान मालक आणि कामगार बाधित होण्याची शक्यता आहे.

धान्य घेऊन घरी जाणारा प्रत्येकजण इतरांना बाधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या लाँकडाऊनमध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारला पीओएस मशीनशिवाय धान्य वाटप करण्याचे आदेश दिले होते. तिच व्यवस्था यावेळी धान्य वितरण करताना केल्यास कोरोना संक्रमण रोखणे शक्य होणार आहे.

दरम्यान, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारने तसा निर्णय घ्यावा, राज्य सरकार यामध्ये काही करू शकत नाही, असे मत व्यक्त केले. मात्र, यामुळे स्वस्त धान्य दुकानात येणारे ग्राहक असुरक्षित आहेत. गेल्या वर्षी लाँकडाऊनच्या काळात राज्यात ३७ रेशन दुकानदार आणि कर्मचारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले होते. त्यामधील निम्मे दुकानदार आणि कर्मचारी पुण्यातील होते.

पुणे शहरात सुमारे १३०० स्वस्त धान्य वितरण करणारे दुकानादार आहेत. सरासरी दररोज ७० ते १०० कार्ड धारक दुकानात धान्य घेण्यासाठी येतात. अशा प्रकारे १३००० जण घरी गेल्यानंतर किमान पाच जणांना बाधित केले तर ? फार मोठी संख्या संक्रमित होऊन प्रचंड भयावह स्थिती केवळ स्वस्त धान्य प्रणाली मुळे होणार आहे. हा धोका ओळखून पीओएस मशीनवर अंगठा देणे पद्धत रद्द करून धान्य वितरण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

पाँस (पीओएस) मशीनवर अंगठा देऊन धान्य वितरण पद्धत पारदर्शक असली तरी कोरोनाचा प्रसार मात्र झपाट्याने होणार आहे, हे रोखण्यासाठी किमान या काळात तरी तात्पुरत्या स्वरूपात गेल्या वर्षीप्रमाणे धान्य वितरण व्हावे. प्रशासनाच्या वतीने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लोकहितास्तव पाँस मशीनवर अंगठा पद्धत तात्पुरती रद्द करावी.

- अँड. संतोष बाठे (धनकवडी)

कोट -

धान्य घ्यायला आलेल्या प्रत्येक शिधापत्रीका धारकाला सानिटाईझर वापरायला सांगतो. तसेच सामाजिक अंतर राखले जाईल याची खबरदरी घेतली जात आहे. परंतु या उपाययोजना संक्रमण रोखतील याची पूर्ण खात्री नाही. - अरून अडागळे - स्वस्त धान्य दुकानदार, धनकवडी.

फोटो ओळ - स्वस्त धान्य दुकानात पाँस (POS) मशीनवर अंगठा देऊन धान्य घेण्यासाठी पात्र शिधा पत्रिका धारकांची लागलेली रांग.

फोटो - धनकवडी १

Web Title: Fear of corona infection from cheap grain stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.