एफएसआयचा सुळसुळाट होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:16+5:302021-01-16T04:15:16+5:30
वाढत्या नागरीकरणामधून पाणी, सांडपाणी, पार्किंग, कचरा विल्हेवाट आदी नागरी मूलभूत सुविधांचे प्रश्न उभे राहणार आहेत. केवळ मेट्रोचा खर्च भागविण्यासाठी ...
वाढत्या नागरीकरणामधून पाणी, सांडपाणी, पार्किंग, कचरा विल्हेवाट आदी नागरी मूलभूत सुविधांचे प्रश्न उभे राहणार आहेत. केवळ मेट्रोचा खर्च भागविण्यासाठी इमारतींसाठी जादा एफएसआय देण्यामुळे पालिकेवर खर्चाचा ताण पडणार आहे. मेट्रो वा रस्ता रुंदीकरण विषय मंजुरी करताना बांधकामांच्या अन्य बाजूंविषयी चर्चा करावी, असे बागुल यांनी म्हटले आहे.
========
‘स्वरभास्कर पुरस्कार’ द्यावा
पुणे : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वरभास्कर नावाने पुरस्कार सुरू केला होता. ४ फेब्रुवारी, २०२१ रोज पंडितजींची १००वी जयंती आहे. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने, सामाजिक अंतर राखत सर्व नियम पाळून या वर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘स्वरभास्कर पुरस्कार’ देण्यात यावा, अशी मागणी बागुल यांनी महापौरांकडे केली आहे. हा पुरस्कार न दिल्यास काँग्रेसकडून हा पुरस्कार दिला जाईल, असेही बागुल यांनी नमूद केले आहे.