कोयत्याचा धाक, मारहाण करून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:10 AM2021-02-14T04:10:38+5:302021-02-14T04:10:38+5:30
याप्रकरणी शंकर वसंत सावंत (वय २९, रा. सोरतापवाडी, खटाटेवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, तीन अनोळखी इसमांविरोधांत गुन्हा ...
याप्रकरणी शंकर वसंत सावंत (वय २९, रा. सोरतापवाडी, खटाटेवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, तीन अनोळखी इसमांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हे भोसरी पुणे येथील कंपनीमध्ये नोकरीस आहे. कंपनीमध्ये जाण्यायेण्यासाठी कंपनीची बस आहे.
शुक्रवार (१२ फेब्रुवारी) रोजी सकाळी ४.४५ च्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी म्हसोबा मंदिरासमोर सोलापूर-पुणे महामार्गालगत कंपनीचे बसची वाट पाहत थांबले होते. सकाळी पाचच्या सुमारांस एक दुचाकी मोटार उरूळी कांचन बाजूकडून आली. त्या गाडीवर तीन इसम बसलेले होते. ते सावंत यांच्यापासून थोडे पुढे जाऊन थांबले. त्या गाडीवरील अंगाने सडपातळ, अंदाजे २५ ते ३० वयोगटातील दोन इसम हे पायी चालत आले. त्यापैकी एकाचे हातात लाकडी दांडके होते व दुस-याचे हातात लोखंडी कोयता होता. त्यातील दांडके हातात असलेल्या मुलाने सावंत यांचे उजव्या पायाचे पोटरीवर दांडके मारले व तुझे जवळ जे काही असेल ते पटकन काढून दे, असे म्हणाला. मारहाण करतील म्हणुन सावंत यांनी खिश्यातील वस्तु काढल्या. त्यामध्ये दोन हजार रुपये रोख रक्कम, दोन बॅंकेचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, कंपनीचे आयकार्ड होते. ते सर्व त्याने घेतले. त्यावेळी त्याचे सोबत असलेला इसम मोबाईल दे असे म्हणाला. त्यावेळी सावंत त्यास तुम्ही सर्व घ्या पण मोबाईल ठेवा असे म्हणाले. त्यावेळी त्याने कोयता दाखविला व की, दे नाहीतर पहा असे म्हणाला. त्यामुळे मोबाईल त्यास दिला. त्यानंतर ते दोघे त्याचे सोबत असणारे इसमाकडे गेले व ते तिघे दुचाकी वरून पुणे बाजुकडे निघून गेले.