ट्रोलिंगमुळे टिष्ट्वटचीही भीती - मधुर भांडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:15 AM2018-01-29T04:15:02+5:302018-01-29T04:15:10+5:30

चित्रपटांना फार पूर्वीपासून वादांना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, चित्रपटसृष्टीने कधीच ठाम भूमिका घेतली नाही. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टिष्ट्वट करण्याचीही भीती वाटते. एखादा चुकीचा शब्द वापरला गेल्यास जोरदार ट्रोलिंग सुरू होते, अशा शब्दांत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले.

 Fear of tempering due to trolling - Madhur Bhandarkar | ट्रोलिंगमुळे टिष्ट्वटचीही भीती - मधुर भांडारकर

ट्रोलिंगमुळे टिष्ट्वटचीही भीती - मधुर भांडारकर

googlenewsNext

पुणे - चित्रपटांना फार पूर्वीपासून वादांना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, चित्रपटसृष्टीने कधीच ठाम भूमिका घेतली नाही. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टिष्ट्वट करण्याचीही भीती वाटते. एखादा चुकीचा शब्द वापरला गेल्यास जोरदार ट्रोलिंग सुरू होते, अशा शब्दांत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मान्यता दिल्यावर त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, चित्रपटाची संहिता सेन्सॉर होता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ८ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाअंतर्गत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची मुलाखत आयोजिण्यात आली होती. संजय डावरा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘काळाप्रमाणे समाज खूप बदलला आहे. ‘इंदू सरकार’च्या वेळी मी अनेक अडचणींचा सामना केला. माझ्यावर आलेली वेळ उद्या कोणावरही येऊ शकते, असे मी ओरडून सांगत असतानाही चित्रपटसृष्टी माझ्या पाठीशी उभी राहिली नाही. ‘पद्मावत’लाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. एखाद्या चित्रपटाला जाहीरपणे पाठिंबा दिल्यास भविष्यात आपल्याला अडचणी येतील, विशिष्ट सरकारचा शिक्का बसेल, घरावर मोर्चे येतील, अशी प्रत्येकाला भीती वाटते. संवेदनशील समाजाकडून ताबडतोब प्रतिक्रिया उमटतात,’ असेही त्यांनी नमूद केले.
भांडारकर म्हणाले, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. एखाद्या मंदिराला भेट दिली की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे झालात का, अशी टिप्पणी केली जाते.
एखादा चित्रपट एखाद्या गटाला आवडतो, तर एखादा गट त्यावर आक्षेप घेतो. मात्र, प्रत्येक चित्रपट सर्वांचे समाधान करू शकत नाही. राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक विषयांवर बेतलेले चित्रपट काढताना ‘डिस्क्लेमर’ दिल्यास आक्षेप घेतला जात नाही. मात्र, चित्रपट विशिष्ट घटनेशी संबंधित असल्याचे सांगताच विरोध सुरू होतो.
चित्रपटनिर्मिती करताना डिस्क्लेमर दाखवणे, पुस्तकावर आधारित चित्रपटासाठी पुस्तकाचे हक्क विकत घेणे, व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी कुटुंबीयांची परवानगी घेणे अशा माध्यमातून दिग्दर्शकांना मार्ग काढता येऊ शकतो.’

समाजातील अनेक विषय महिलाप्रधान दृष्टिकोनातून मांडता येऊ शकतात. दिग्दर्शक एखाद्या चित्रपटावर खूप मेहनत घेतो. तो बोटीवरचा कॅप्टन असतो आणि इतर सर्व प्रवासी असतात. कलाकाराने दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला हवा. सध्या भारतात चालू घडामोडींवर आधारित चित्रपट बनत आहेत. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटांमधूनही संदेश देणे आवश्यक असते. ‘इंदू सरकार’च्या निमित्ताने नवीन पिढीला आणीबाणीच्या काळाबाबत किमान मूलभूत माहिती मिळाली. आणीबाणीबाबत दस्तावेज उपलब्ध नाही, त्यामुळे चित्रपटातून त्यावर भाष्य करता आले. यावर्षी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार आहे.
- मधुर भांडारकर

Web Title:  Fear of tempering due to trolling - Madhur Bhandarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे