आताच्या चित्रविचित्र राजकारणाने बेरोजगारी वाढण्याची भीती- रामदास फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 03:13 AM2019-03-14T03:13:11+5:302019-03-14T03:14:12+5:30

चिंचवडमध्ये यशवंत-वेणू पुरस्काराचे वितरण सोहळा, भविष्यात गुन्हेगारी वाढणार

Fear of unemployment due to the graphic politics of the present day - Ramdas Futane | आताच्या चित्रविचित्र राजकारणाने बेरोजगारी वाढण्याची भीती- रामदास फुटाणे

आताच्या चित्रविचित्र राजकारणाने बेरोजगारी वाढण्याची भीती- रामदास फुटाणे

Next

पिंपरी : यशवंतराव चव्हाण यांच्या काळामध्ये राजकारण खेळीमेळीचे होते. पक्षांमधील नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये मैत्रिपूर्ण संबंध होते. त्यांच्यामध्ये संवादाची भाषा होती. मात्र आताच्या चित्रविचित्र राजकारणामध्ये भविष्य धोक्यात आले आहे. आताचे राजकारण हे वेगळ्याच दिशेने चालले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढेल, असे प्रतिपादन वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहामध्ये यशवंत-वेणू गौरव पुरस्काराचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते फुटाणे व त्यांची पत्नी प्रभावती यांना ‘यशवंत-वेणू पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते वैजिनाथ घोंगडे यांना यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार, सोमाटणेचे माजी उपसरपंच सचिन मुºहे, युवा उद्योजक कुणाल काकडे यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

काल जो एका पक्षाचा नेता होता, तो आज दुसऱ्या पक्षामध्ये सामील होत आहे. सध्या स्वप्न दाखवणाऱ्या राजकारण्यांची गर्दी झाली आहे. त्यांच्या मागे असणारे समर्थक वाढत गेले, तर येत्या काळामध्ये अवघड परिस्थिती निर्माण होईल.
- रामदास फुटाणे , वात्रटीकाकार

सध्याचे राजकारण आणि माणसे संकुचित होत चालली आहेत. यशवंतरावांच्या ठायी शब्दसामर्थ्य, वक्तृत्व होते. आताच्या राजकारण्यांत तसे फार कमी पाहायला मिळते. त्यामुळे आजच्या काळात यशवंतरावांची प्रकर्षाने आठवण होते.
- उल्हास पवार, ज्येष्ठ नेते

Web Title: Fear of unemployment due to the graphic politics of the present day - Ramdas Futane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.