सततच्या पावसाने अंबिल ओढानजीक भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:21+5:302021-06-19T04:09:21+5:30
अंबिल ओढामधील अर्धवट काम तसेच राडारोडा न उचल्याने पुराचा धोका कायम आणि त्यात अतिक्रमण आहे त्याठिकाणी कारवाई होताना ...
अंबिल ओढामधील अर्धवट काम तसेच राडारोडा न उचल्याने पुराचा धोका कायम आणि त्यात अतिक्रमण आहे त्याठिकाणी कारवाई होताना दिसत नाही.
संदीप काळे सामाजिक कार्यकर्ते -सर्वे नं १३३ अंबिल ओढा हा गेल्या काही महिन्यांपूर्वी स्थानिक नगरसेवक यांच्यामार्फत ओढा काही प्रमाणात साफ करण्यात आला होता; मात्र साफ करण्यात आलेला हा गाळ उचलून नेण्यात आला नाही. गाळ एका बाजूला करून ढीग करण्यात आला आहे. त्यामुळे ओढ्याचे पात्र कमी झाले आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची व अंबिल ओढ्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी पुन्हा शिरून जीवितहानी व नागरिकांच्या घरातील चिजवस्तूंचे नुकसान होण्याची नागरिकांच्या मनात भीती पसरली आहे.
फोटो ओळ - राडारोडा न उचलल्यामुळे अंबिल ओढ्यामधील परिस्थिती.