जीवाच्या भितीने बाळगले पिस्तूल अन् सापडला पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:14+5:302021-09-02T04:21:14+5:30

पुणे : त्याने ११ वर्षांपूर्वी एकाचा खून केला होता. त्यामुळे त्याला भीती वाटत होती. त्यातून त्याने स्वत:जवळ पिस्तूल बाळगले ...

Fearing for his life, the pistol was found in the police trap | जीवाच्या भितीने बाळगले पिस्तूल अन् सापडला पोलिसांच्या जाळ्यात

जीवाच्या भितीने बाळगले पिस्तूल अन् सापडला पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

पुणे : त्याने ११ वर्षांपूर्वी एकाचा खून केला होता. त्यामुळे त्याला भीती वाटत होती. त्यातून त्याने स्वत:जवळ पिस्तूल बाळगले होते. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळाली अन् पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले.

सचिन अप्पा रणदिवे (वय ३१, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगार तपासणी करीत असताना अंमलदार दत्ता सोनावणे व महेश बामगुडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन रणदिवे हा मीरा सोसायटी येथील रस्त्यावर उभा असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सचिन रणदिवे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ पिस्तूल व १ काडतूस असा ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला. अधिक चौकशी केली असता त्याने २०१० मध्ये एकाचा खून केला होता. त्याच्यापासून त्याला जीवाची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने पिस्तूलजवळ बाळगले असल्याने सांगितले. सचिन रणदिवे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे ३ गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Fearing for his life, the pistol was found in the police trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.