#MeToo: एफटीआयआयमधील विद्यार्थिनींवर शेरेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:26 AM2018-10-25T05:26:36+5:302018-10-25T05:26:59+5:30
‘वुई आर नॉट सेफ हिअर’! एफटीआयआय ही पुरुषी वर्चस्वाखाली असलेली संस्था आहे.
पुणे : ‘वुई आर नॉट सेफ हिअर’! एफटीआयआय ही पुरुषी वर्चस्वाखाली असलेली संस्था आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली येथे जे काही चालते त्याविरूद्ध जर मुलीने आवाज उठविला तर ‘तुम क्या सती सावित्री हो क्या? अशा शेरेबाजीला सामोरे जावे लागते. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे मुलींचा आवाज प्रशासनाकडूनही दाबण्याचा प्रयत्न केला जातो.... हे बोल आहेत, फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया संस्थेतील आजी आणि माजी विद्यार्थिनींचे.
‘मी टू’ च्या माध्यमातून महिला लैंगिक शोषणाविरूद्ध बोलू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संस्थेमधील एका विद्यार्थिनीने तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करीत अंतर्गत समितीकडे तक्रार केली. तिला पाठिंबा दर्शवित एफटीआयआयमध्ये विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरच विद्यार्थिनींनी बोट ठेवले. तेथे शिकत असताना पोशाख आणि वर्तवणूक चांगली ठेवली तर त्या लैगिंक शोषणाच्या बळी ठरणार नाहीत, असे मुलांचे म्हणणे असल्याचे ऐकून धक्का बसल्याचे माजी विद्यार्थिनीने म्हटले.