व्यापारी महासंघाने व्यक्त केला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:55+5:302021-06-01T04:09:55+5:30
महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया म्हणाले की, यापुढेही आयुक्त अशीच सहकार्याची भूमिका ठेवतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी महासंघाचे अध्यक्ष फत्तेहचंद ...
महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया म्हणाले की, यापुढेही आयुक्त अशीच सहकार्याची भूमिका ठेवतील अशी अपेक्षा आहे.
तत्पूर्वी महासंघाचे अध्यक्ष फत्तेहचंद रांका आणि पितळीया यांनी सोमवारी (दि. ३१) सकाळी आयुक्तांची भेट घेत शहरातील दुकाने उघडू देण्याची आग्रही मागणी केली. त्यावेळी “व्यापाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत चांगले सहकार्य केले आहे. यापुढेही त्यांनी असेच सहकार्य करावे. नवीन आदेश काढताना सकारात्मक विचार करण्यात येईल,” असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे पितळीया यांनी सांगितले.
त्यानुसार अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त अन्य दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील निर्बंध पूर्वीसारखेच कायम असल्याने शहराबाहेरील ग्राहकांना पुण्यात खरेदीसाठी येता येणार नाही. दरम्यान, संध्याकाळी महापालिकेचा निर्णय आल्यानंतर व्यापारी वर्गाने दुकाने उघडण्याची तयारी चालू केली. शाळा-महाविद्यालये सुरू होण्यासंदर्भात कोणतीही स्पष्टता अद्याप नाही. त्यामुळे दर वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात गणवेश, शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके आदींच्या खरेदीसाठी उडणारी झुंबड या वेळी तूर्त पाहण्यास मिळणार नाही.