आज दुकाने सुरू ठेवण्यावर व्यापारी महासंघ ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:11 AM2021-04-12T04:11:13+5:302021-04-12T04:11:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासन व पुण्यातील स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयाला व्यापारी महासंघाच्या वतीने ...

The Federation of Traders insists on continuing the shops today | आज दुकाने सुरू ठेवण्यावर व्यापारी महासंघ ठाम

आज दुकाने सुरू ठेवण्यावर व्यापारी महासंघ ठाम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य शासन व पुण्यातील स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयाला व्यापारी महासंघाच्या वतीने कडाडून विरोध करण्यात येत आहे. व्यापा-यांची भूमिका समजावून घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या व्यापा-यांसोबत झालेल्या बैठकीत कडक निर्बंध पाळून व्यापारी सोमवार (दि.12) पासून आपली दुकाने सुरू ठेवण्यावर पुणे व्यापारी महासंघ ठाम असल्याची माहिती अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

राज्य शासनाच्या व महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुण्यातील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पुणे व्यापारी महासंघ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनाची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, यासह सचिव महेंद्र पितळिया महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल दोन-अडीच तास चालेल्या बैठकी प्रशासनाने गंभीर परिस्थितीची जाणीव व्यापा-यांना करून दिली. परंतु गेल्या वर्षी तोट्यात गेलेला व्यापार आता सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊन लागले. व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढतो, अशी ओरड केली जाते; पण शहरात अनेक कारखाने, पेट्रोलपंप, रिक्षा, खाद्यपदार्थ, स्टॉल्सवर गर्दी आहे. दिवसा पाच व्यक्तींना एकत्र फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने लादायला हवीत, त्यांना बंधने न घालता केवळ व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे. एप्रिल, मे महिन्यांत रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुढीपाडवा, अक्षयतृतीया यांसारखे महत्त्वाचे सण आहेत. यामुळे बैठकीत व्यापा-यांनी लाॅकडाऊनला कडाडून विरोध करत सोमवारी दुकाने सुरू ठेवण्यावर ठाम आहेत. दरम्यान रात्री उशिरापर्यंत व्यापारी महासंघाची राज्याची बैठक सुरू होती.

--------

शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ

रविवारी रात्री उशिरापर्यंत व्यापारी महासंघ व अन्य संघटनांशी झालेल्या बैठकीनंतर व्यापारी सोमवार (दि.12) आपली दुकाने उघडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांच्या वतीने शहरातील पोलीस बंदोबस्त मोठी वाढ केली आहे.

Web Title: The Federation of Traders insists on continuing the shops today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.