‘बुद्धिस्ट सर्किट’मध्ये शिवनेरी, तुळजा, लेण्याद्रीच्या समावेशासाठी मागविला अभिप्राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:45+5:302021-07-20T04:08:45+5:30

जुन्नर शहरापासून काही अंतरावर शिवनेरी, तुळजा, सुलेमान, मानमोडी या गटात विभागलेल्या २२० लेण्यांचा समूह असून सातवाहन साम्राज्याची आर्थिक राजधानी ...

Feedback sought for inclusion of Shivneri, Tulja, Lenyadri in 'Buddhist Circuit' | ‘बुद्धिस्ट सर्किट’मध्ये शिवनेरी, तुळजा, लेण्याद्रीच्या समावेशासाठी मागविला अभिप्राय

‘बुद्धिस्ट सर्किट’मध्ये शिवनेरी, तुळजा, लेण्याद्रीच्या समावेशासाठी मागविला अभिप्राय

googlenewsNext

जुन्नर शहरापासून काही अंतरावर शिवनेरी, तुळजा, सुलेमान, मानमोडी या गटात विभागलेल्या २२० लेण्यांचा समूह असून सातवाहन साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या जुन्नर शहराजवळ दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वाधिक बुद्ध लेण्या कोरण्यात आल्या होत्या. हा लेण्यांचा समूह आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एएसआय) अखत्यारित असून या लेण्यांच्या विकासासाठी एएसआयने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या लेण्यांच्या अभ्यासासाठी देश-विदेशातून अभ्यासक व पर्यटक येत असतात. या लेणी समूहाचा विकास केल्यास बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी व परदेशी पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र आणि पर्यटनस्थळ होऊ शकतं या भूमिकेतून या लेणी समूहाचा केंद्र सरकारच्या ‘बुद्धिस्ट सर्किट’ योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेऊन पर्यटनमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पर्यटन संचालनालयाच्या संचालकांकडे अभिप्राय मागविला आहे.

पर्यटन संचालकांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे रीतसर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, जुन्नर पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आहे. या तालुक्यात पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. मात्र त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न असून लेणी समूहाचा ‘बुद्धिस्ट सर्किट’मध्ये समावेश करण्यासाठीचे प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांचा सर्व स्तरांवर आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Feedback sought for inclusion of Shivneri, Tulja, Lenyadri in 'Buddhist Circuit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.