मराठा महासंघाच्यावतीने वन्यप्राण्यांसाठी पानवठ्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:00+5:302021-03-24T04:11:00+5:30

यावेळी मराठा महासंघ जिल्हा सचिव मयूर सोळसकर, शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मयूर काळे (कर्जत), विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सूरज ...

Feeding facility for wildlife on behalf of Maratha Federation | मराठा महासंघाच्यावतीने वन्यप्राण्यांसाठी पानवठ्याची सोय

मराठा महासंघाच्यावतीने वन्यप्राण्यांसाठी पानवठ्याची सोय

Next

यावेळी मराठा महासंघ जिल्हा सचिव मयूर सोळसकर, शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मयूर काळे (कर्जत), विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सूरज चोरघे, मराठा महासंघ उपाध्यक्ष संजय थोरात, खुटबावचे बाळासाहेब तावरे, नागनाथ मुळीक, अमर चोरघे, खोरचे मराठा महासंघाचे माऊली डोंबे, वनअधिकारी सचिन पुरी, लिंबाजी पिंगळे, दिलीप कुदळे, एक मित्र एक वृक्ष संघाचे सदस्य तुषार शिंदे, प्रज्ज्वल डोंबे, भगवान लवांडे, तौफीक सय्यद, इसाक सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पाण्याच्या टँकरचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष सूरज चोरघे व विघ्नहर्ता ग्रुप यवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या झळा वाढत चालल्या असून त्याच प्रमाणे तितकेच सामाजिक कार्य करणारे हातदेखील वाढत चालले आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेली खोर अभयारण्य परिसरातील हरणे पाण्याच्या शोधत ही बातमी वाचकांनी चांगलीच मनावर घेतली व अनेक दानशूर हात आज वन्यप्राण्यांच्या मदतीला धावून येत आहेत.

--

फोटो क्रमांक : २३ खोर पाणीपुरवठा

फोटोओळ शहीद दिनानिमित्त खोर येथील पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पाणी सोडण्यात आले.

Web Title: Feeding facility for wildlife on behalf of Maratha Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.