उन्हाचा चटका लागला जाणवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:21 AM2021-02-28T04:21:25+5:302021-02-28T04:21:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पश्चिम किनारपट्टीवर काही दिवसांपूर्वी आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानंतर आता हवामान कोरडे झाले असून त्यामुळे ...

Feel the heat | उन्हाचा चटका लागला जाणवू

उन्हाचा चटका लागला जाणवू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पश्चिम किनारपट्टीवर काही दिवसांपूर्वी आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानंतर आता हवामान कोरडे झाले असून त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुपारी कडक ऊन तर सायंकाळनंतर गारवा, रात्री किंचित थंडी, असे वातावरण सध्या राज्यात जाणवत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ३८.४ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

विदर्भात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून कमाल व किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३६.१, लोहगाव ३६.३, जळगाव ३६.८, कोल्हापूर ३५, महाबळेश्वर ३०.५, मालेगाव ३६.२, नाशिक ३५.५, सांगली ३७.२, सातारा ३५.३, सोलापूर ३६.६, मुंबई ३१, सांताक्रूझ ३२.६, अलिबाग २९.६, रत्नागिरी ३२.५, पणजी ३३.९, डहाणु ३०.९, औरंगाबाद ३६, परभणी ३६.५, नांदेड ३३, अकोला ३८,.१, अमरावती ३७.४, बुलढाणा ३५, ब्रम्हपुरी ३८.४, चंद्रपूर ३८.२, गोंदिया ३५, नागपूर ३७.३, वर्धा ३७.८.

Web Title: Feel the heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.