समभावाची भावना नाहीशी होणे धोका
By admin | Published: December 22, 2016 02:30 AM2016-12-22T02:30:07+5:302016-12-22T02:30:07+5:30
देशामध्ये संवेदनशील राजकीय नेतृत्व नसेल तर नक्कीच तिसरे महायुद्ध घडू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष
पुणे : देशामध्ये संवेदनशील राजकीय नेतृत्व नसेल तर नक्कीच तिसरे महायुद्ध घडू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्वदेशसमभावही नाहिसा होत आहे. हाच जगापुढील सर्वात मोठा धोका आहे, असा सूचक इशारा ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक कुमार केतकर यांनी दिला.
अतुल कहाते लिखित ‘अमेरिकी राष्ट्राध्यक्ष’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ‘नवे राष्ट्राध्यक्ष व भारतात होणारे बदल’ याविषयावर ते बोलत होते. मेहता पब्लिकेशन निर्मिती हाऊसच्या प्रमुख राज्यश्री देशमुख उपस्थित होत्या.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत लोकसंख्येचे वय, भौगोलिकता, लिंगभेद आणि सामाजिक वर्ग अशी एक विभागणी झाली, ट्रम्प अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांच्या विरोधात पूर्व-पश्चिम भागातील नागरिक रस्त्यावर उतरले. पारंपरिक कामगार वर्गापेक्षा बुध्दीजीवी आणि सुशिक्षित कामगारांनी ट्रम्प यांना पसंती दिली. न्यूयॉर्क टाईम्स ने ‘ द मँड प्रेसिडेंट वुई हँव’ असा अग्रलेख लिहिला आणि तो जागतिक स्तरावर व्हायरल झाला. मोदींबददल असं लिहावे असं वाट्तं, कारण तेच शहाणे, त्यांना सगळं कळते, असा मिश्किल टोला केतकरांनी मोदी यांना लगावला.