पाय घसरुन खोल दरीत पडला, रेल्वे सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 09:32 PM2018-08-19T21:32:10+5:302018-08-19T21:33:53+5:30

सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील उंच सुळका असलेल्या कुरवंडे गावातील ड्युक्स नोज या सुळक्यावर फिरायला आलेल्या काही  पर्यटकांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला आहे.

The feet fell into the deep valley, the death of the railway section engineer in lonavala | पाय घसरुन खोल दरीत पडला, रेल्वे सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू 

पाय घसरुन खोल दरीत पडला, रेल्वे सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू 

Next

लोणावळा : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील उंच सुळका असलेल्या कुरवंडे गावातील ड्युक्स नोज या सुळक्यावर फिरायला आलेल्या काही  पर्यटकांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहन महाजन (वय 32, रा. पडघा, माटूंगा. रेल्वे सिनियर सेक्शन इंजिनिअर माटूंगा) असे या दरीत पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेची काही अधिकारी कर्मचारी लोणावळा परिसरात फिरायला आले होते. कुरवंडे गावातील सह्याद्रीचा उंच सुळका असलेल्या नागफणी याठिकाणी जाऊन पुन्हा खाली येत असताना रोहन याचा पास घसरल्याने तो दरीत सुमारे साडेतीनशे ते चारशे फुट खोल दरीत पडला. यामध्ये गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा शहराचे पोलीस पथक व शिवदुर्ग मित्र हे रेस्कू पथक घटनास्थळी पोहचत त्यांनी दरीत शोधमोहीम राबवली. साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला असून शिवदुर्ग पथकाने मृतदेह बाहेर काढला आहे. 
 

Web Title: The feet fell into the deep valley, the death of the railway section engineer in lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.