‘मुळशी पॅटर्न’ कलाकारांचा मुळशीकरांकडून सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:35 AM2019-01-22T02:35:20+5:302019-01-22T02:35:26+5:30
मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा मुळशी तालुका पत्रकार संघ आणि नगरसेवक किरण दगडे यांच्यावतीने बावधन येथे नागरी सत्कार करण्यात आला.
भूगाव : मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा मुळशी तालुका पत्रकार संघ आणि नगरसेवक किरण दगडे यांच्यावतीने बावधन येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कलावतांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या कलावतांना पाहण्यासाठी बावधनमध्ये गर्दी लोटली होती.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार शरद ढमाले, बबनराव दगडे, तुकाराम हगवणे, सत्यवान उभे, किरण दगडे, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरपंच पियुषा दगडे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुळशी तालुका वारक?्यांचा, कुस्तीगिरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्याची ओळख जगभर पोचवायची आहे. आतापर्यंत मिळालेले सगळे पुरस्कार आईवडीलांना समर्पित करतो, असे भावोद्गार प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काढले. तरडे पुढे म्हणाले की मुळशी पॅटर्न चित्रपटाला अनेक भाषांमधून मागणी येवू लागली आहे. शेतजमीन विकल्यानंतर कुटूंबाची अवस्था कशी बिकट होते, त्यातून निर्माण होणा?्या गुन्हेगारीचे वास्तववादी दर्शन या चित्रपटातून दाखविले आहे. त्यामुळे आजही हा चित्रपट गाजत आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित रेती पॅटर्न या चित्रपटाची निमीर्ती करणार आहे.
अशोक मोहोळ म्हणाले की युवा पिढीला चांगला संदेश देणारा हा चित्रपट आहे. मुळशी तालुक्यातल्या एका शेतक?्याचा मुलाने काढलेला चित्रपट भारतभर गाजतोय. सलमान खान यावर चित्रपट काढून त्याचे दिग्दर्शन करण्यासाठी प्रवीण तरडे यांना आमंत्रित करतोय. यातच या चित्रपटाचे यश सामावलेले आहे. प्रास्ताविकात किरण दगडे यांनी तालुक्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
यावेळी प्रास्ताविक नगरसेवक किरण दगडे, सूत्रसंचालन मुळशी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जितेंद्र गोळे यांनी केले.
>लेकाचं कौतुक ऐकून आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू
या कार्यक्रमासाठी प्रवीण तरडे यांचे वडील विठ्ठल आणि आई रखमाबाई आवर्जून उपस्थित होते. व्यासपीठावरील उपस्थितांनी तरडे यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी त्यास दाद दिली. लेकाचे हे कौतुक ऐकताना रखमाबार्इंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. या मातापित्यांना सत्कारासाठी व्यासपीठावर आमंत्रित केल्यानंतर रखमाबाईंची भावनाविवशता सर्वांना दिसली.