विविध क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:00 AM2018-08-28T02:00:42+5:302018-08-28T02:00:59+5:30
भूगाव ग्रामपंचायत : विद्यार्थ्यांना वह्या व गणवेशाचे वाटप
भूगाव : भूगाव ग्रामपंचायतीतर्फे समाजातील विविध क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या वेळी बदली झालेल्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या व गणवेश वाटप करण्यात आले.
या वेळी सरपंच विजय सातपुते, उपसरपंच जयश्री कुंभार, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, सचिन मिरघे, मधुकर गावडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र इंगवले, माजी उपसरपंच मनीषा शेडगे, सुजाता सांगळे, सुरेखा कांबळे, प्रमिला चोंधे, हर्षा चोंधे, मंगल फाळके, पोलीस पाटील नितीन चोंधे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश घारे, सचिव अनिल चोंधे, दीपकआबा करंजावणे, मुख्याध्यापक लव गायकवाड, भास्कर गायकवाड, बाळासाहेब बडदे, एकनाथ शेडगे, गोविंद खानेकर, नारायण करंजावणे, राकेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात दहावी व बारावीतील प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील प्रथम क्रमांक मिळविलेल्या, तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम आलेल्या, जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम, स्कॉलरशिप व नवोदय विद्यालय प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
भूगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा आलेख उंचाविण्यात शिक्षकांचा मोठा हातभार आहे. यामुळेच बदली तसेच नवीन आलेल्या शिक्षकांचा, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.
- विजय सातपुते
आदर्श सरपंच, भूगाव