महिला कर्मचाऱ्यास मीटररूममध्ये कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:15+5:302021-03-18T04:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मीटर रूममध्ये कोंडण्याचा प्रकार समोर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मीटर रूममध्ये कोंडण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सलीम बशीर सय्यद (वय ४१, रा. सुखनिवास, एस आर ए बिल्डिंग, मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधुरी सुनिल कुलसंगे (वय २८, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. सलीम सय्यद यांचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. त्यावर आरोपी चिडून मीटर रूमच्या दरवाज्यासमोरून फिर्यादींच्या अंगावर धावत आला. आमची कट केलेली लाईट चालू कर, नाही तर मी तुला येथेच रुममध्ये कोंडून ठेवेन, असे धमकावले. त्या समजावून सांगत असताना मीटर रूमची बाहेरुन कडी लावून फिर्यादी यांना आत कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी कार्यालयातील ऑफिस असिस्टंट शैलेश धुमाळ यांना फोन करुन बोलावून घेतले. धुमाळ यांनी त्यांची सुटका केली. सय्यद याने त्यांनाही शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणला.