शिक्षक मानसिक त्रास देत असल्याची महिला शिक्षिकेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:39+5:302021-03-20T04:10:39+5:30

सदर महिला व पुरुष लोहगाव परिसरातील एका वस्ती शाळेवर मागील काही वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करतात. मात्र गेले दीड ...

Female teacher complains of mental harassment | शिक्षक मानसिक त्रास देत असल्याची महिला शिक्षिकेची तक्रार

शिक्षक मानसिक त्रास देत असल्याची महिला शिक्षिकेची तक्रार

Next

सदर महिला व पुरुष लोहगाव परिसरातील एका वस्ती शाळेवर मागील काही वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करतात. मात्र गेले दीड वर्षापासून शिक्षक हा छोट्या-छोट्या कारणावरुन कामात अडवणूक करण्याबरोबरच मानसिक त्रास देत असल्याचा आरोप शिक्षिकेने २० दिवसांपूर्वी लेखी स्वरुपात केला आहे. चार दिवसांपासून तिला सर्दी, अंगदुखी, ताप यांसारखी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहेत. मात्र तक्रारीची चौकशी पूर्ण होऊन, संबधित शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत कोविडची चाचणी करण्यास अथवा कोविडचा उपचार घेण्यास नकार दिल्याने, शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर शिक्षकाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनेक वेळा शाळेत उशिरा आल्यानंतर, त्यांना सही करण्यास नकार दिल्यानेच त्यांनी माझ्याविरोधात खोट्या व बिनबुडाच्या तक्रारी केल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

लोहगाव येथील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरुन, संबंधित पुरुष शिक्षकाची चौकशी करण्यासाठी चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. ही समिती पुढील ४८ तासांत चौकशी अहवाल देणार आहे. हा चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.

रामदास वालझडे (हवेली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी)

Web Title: Female teacher complains of mental harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.