सुपेतील ‘कुंपण’ ठरतेय चिंकारांना घातक

By Admin | Published: February 12, 2015 11:44 PM2015-02-12T23:44:36+5:302015-02-12T23:44:36+5:30

परिसरात पुणेकरांनी जमिनी खरेदी करून तारेचे कुंपणं टाकली आहेत. मात्र, येथे मुक्त विहार करणाऱ्या चिंकारांना ते घातक ठरत आहे.

The 'fencing' of the supplements is dangerous to the chimneys | सुपेतील ‘कुंपण’ ठरतेय चिंकारांना घातक

सुपेतील ‘कुंपण’ ठरतेय चिंकारांना घातक

googlenewsNext

सुपे : परिसरात पुणेकरांनी जमिनी खरेदी करून तारेचे कुंपणं टाकली आहेत. मात्र, येथे मुक्त विहार करणाऱ्या चिंकारांना ते घातक ठरत आहे. या हरिणांचा नाहक बळी जात आहे. यामुळे येथील मयूरेश्वर अभयारण्यातील चिंकाराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही कुंपणे काढून टाकण्याची मागणी निसर्गप्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे.
मयूरेश्वर अभयारण्य सुमारे ५१४ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. ते चिंकारासाठीच तयार करण्यात आले आहे. मात्र, येथील झाडे-झुडपे राहिली नाहीत. त्यामुळे चिंकारा मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागली आहेत. त्यात येथे जमिनी खरेदी करून गुंठेवारीनुसार तारेची कुंपने तयार केली आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. कुंपनामुळे चिंकारा बऱ्याचदा कुत्र्याच्या तावडीत सापडतात.
तर, काही वाहनांच्या धडकेने मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे त्यांची संख्या कमी होत असल्याची माहिती बारामती येथील निसर्ग जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. महेश गायकवाड यांनी दिली.
निसर्ग जागर प्रतिष्ठानच्या वतीने ट्रान्झॅक्ट पद्धतीने नुकतीच प्राण्यांची गणना करण्यात आली. यामध्ये सुमारे १७० चिंकारांमध्ये २६ लहान पिले, ४० नर जात, तर इतर मादी जातीची चिंकारा आढळून आले. (वार्ताहर)

Web Title: The 'fencing' of the supplements is dangerous to the chimneys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.