फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 03:40 PM2019-01-12T15:40:21+5:302019-01-12T15:43:55+5:30
फर्ग्युसन महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थींनींना हाेणार आहे.
पुणे : विद्यार्थींनींच्या आराेग्यासाठी आवश्यक असणारे सॅनिटरी नॅपकीन विद्यार्थीनींना महाविद्यालयात उपलब्ध व्हावे या उद्देशाने पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयाने पाऊल टाकले असून महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहेत. यामशीनचा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना फायदा हाेणार आहे.
अनेकदा सॅनटरी नॅपकीन बाबत समाजात जागरुकता नसल्याचे दिसून येते. स्त्रीयांच्या मासिक पाळीबाबत खुलेपणाने बाेलले जात नाही. मासिक पाळीबाबत अनेक अंधश्रद्धा देखील समाजात रुढ झालेल्या दिसतात. काहीवेळा मासिक पाळीच्या दरम्यान सॅनटरी नॅपकीन नसेल तर मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे महाविद्यालयात व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आल्याने याचा फायदा विद्यार्थीनींना हाेणार आहे. सुरुवातीला महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत एक मशीन बसविण्यात आले हाेते. परंतु महाविद्यालयाचा परिसर माेठा असल्याने तसेच काॅमप्युटर सायन्स विभाग मुख्य इमारतीपासून दूर असल्याने त्या विभागात सुद्धा एक मशीन बसविण्यात यावे अशी मागणी विद्यार्थीनींकडून करण्यात आली हाेती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने आठवडाभराच्या आत काॅमप्युटर विभागात आणखी एक सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशिन्स बसविले. प्रशासनाने तात्काळ केलेल्या कारवाईचे विद्यार्थीनींकडून स्वागत करण्यात आले असून महाविद्यालयाचे आभार विद्यार्थीनींनी मानले.