शोकसभेनंतर ट्रस्टींची भोजनावळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2016 01:35 AM2016-02-04T01:35:44+5:302016-02-04T01:35:44+5:30
महाविद्यालयातील १४ विद्यार्थी समुद्रात बुडून मृत्युमुखी पडल्यामुळे आयोजित शोकसभा, हातातोंडाशी आलेला मुलगा गेल्याने पालकांवर कोसळलेले डोंगराएवडे दु:ख आणि काही
पुणे : महाविद्यालयातील १४ विद्यार्थी समुद्रात बुडून मृत्युमुखी पडल्यामुळे आयोजित शोकसभा, हातातोंडाशी आलेला मुलगा गेल्याने पालकांवर कोसळलेले डोंगराएवडे दु:ख आणि काही वेळापूर्वीच पालकांनी महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचे आरोप केले असूनही आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या ट्रस्टींनी असंवदेनशीलता दाखवून शोकसभेनंतर भोजनावळीचे आयोजन केले. पालक समोर असताना हे ट्रस्टी भोजनावर ताव मारत होते.
महाविद्यालयाच्या सभागृहात संस्थेच्या वतीने बुधवारी शोकसभा घेण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या पालकांचे दु:ख कधीही न भरून येणारे आहे.
संस्थेचे सर्व पदाधिकारी पालकांच्या दु:खात सहभागी आहेत, असे शोकसभेत सांगण्यात आले. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांशी विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांनी उद्धटपणे संवाद साधला. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त करून संस्थेविरोधात आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर काही कालावधीतच संस्थेच्या विश्वस्तांनी व पदाधिकाऱ्यांनी भोजन मागविले. संस्थेच्या आवारातील शेडखाली खुर्च्या टाकून भोजनावळ सुरू होती. (प्रतिनिधी)