फियार्दीच फिरला, पोलीस बुचकाळ्यात

By admin | Published: March 25, 2017 10:18 PM2017-03-25T22:18:38+5:302017-03-25T22:18:38+5:30

र्षभरापूर्वी पुस्तकाच्या दुकानातून एका चोराने तब्बल पावणे दोन लाख रुपये चोरुन नेले होते. त्याप्रकरणी मालकाने पोलिसांकडे फिर्यादही दिली होती.

Fidayeet wandered, police goch | फियार्दीच फिरला, पोलीस बुचकाळ्यात

फियार्दीच फिरला, पोलीस बुचकाळ्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - वर्षभरापूर्वी पुस्तकाच्या दुकानातून एका चोराने तब्बल पावणे दोन लाख रुपये चोरुन नेले होते. त्याप्रकरणी मालकाने पोलिसांकडे फिर्यादही दिली होती. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलवरुन त्याचा शोध घेत दोनदा थेट लातूरच्या मुळगावी जाऊन शोध घेतला. दुस-या प्रयत्नात आरोपी सापडला. आरोपीला अटक केल्यानंतर आता फिर्यादी म्हणतात की, आम्हाला पैसे मिळाले, आमची काही तक्रार नाही. त्यामुळे विश्रामबाग पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. विश्रामबाग पोलिसांनी बालाजी जयवंत सावरगावे (वय ३९, रा़ कर्वेनगर) याला अटक करुन शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
 
याप्रकरणी अमृतराव किसन काळोखेयांनी फिर्याद दिली होती. हा प्रकार सदाशिव पेठेतील आदित्य डिस्ड्रीब्युटर्स या पुस्तक प्रकाशन व वितरणाच्या कार्यालयात २५ व २६ जानेवारी २०१६ दरम्यान बालाजी सावरगावे यांनी कपाट ठेवलेली १ लाख ७५ हजार रुपये चोरुन नेली होती. या फिर्याद मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. आता तो लातूरला असल्याचे समजल्यावर तेथे जाऊन सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ राऊत व त्यांच्या सहका-यांना त्याला पकडले़ याबाबत राऊत यांनी सांगितले की, पोलिसांनी सावरगावे याला पकडल्यानंतर काळोखे यांनी आम्हाला चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी १ लाख रुपये त्यांच्या नातेवाईकांनी आणून दिले़ बाकीचे पैसेही देतो, असे सांगून सावरगावे यांना सांगू नको, असे सांगितले होते.
 
त्यामुळे आम्ही कोणाला सांगितले नाही. आता आमची त्यांच्याविरुद्ध काहीही तक्रार नाही़ फिर्यादींच्या अशा या जबाबामुळे आमचे इतक्या दिवसांचे परिश्रम वाया गेल्याचे राऊत यांनी सांगितले़
 

Web Title: Fidayeet wandered, police goch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.