कठुआ अत्याचाराविरोधात तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:26 AM2018-04-16T03:26:19+5:302018-04-16T03:26:19+5:30

कठुआ आणि उन्नाव येथील झालेल्या बलात्कार व निघृण खून प्रकरणाचे पडसात देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध घटनांच्या वतीने गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. अनेक नेटकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

Fierce anger against Kadua atrocities | कठुआ अत्याचाराविरोधात तीव्र संताप

कठुआ अत्याचाराविरोधात तीव्र संताप

Next

पुणे - कठुआ आणि उन्नाव येथील झालेल्या बलात्कार व निघृण खून प्रकरणाचे पडसात देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध घटनांच्या वतीने गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. अनेक नेटकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. बलात्कारांना फाशी झालीच पाहिजे, मोदी सरकार जागे व्हा, वी वाँट जस्टिस, असिफा हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है, अशी घोषणाबाजी करीत यावेळी अनेकांनी जस्टिस फॉर असिफाचे फलक हाती घेतले होते. असिफाला न्याय मिळावा म्हणून नेटकऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपला काळ्या रंगाचे डीपी ठेवले होते. तसेच विविध व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर असिफाला न्याय मिळावा म्हणून पुढील २४ तास काळे डीपी ठेवावेत, असे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे अनेकांनी आपले डीपी बदलेले होते. तर फेसबुकवर #्न४२३्रूीऋङ्म१ङं३ँ४ं
#ख४२३्रूीऋङ्म१वल्लल्लंङ्म टॅग करत अनेक पोस्ट टकण्यात आल्या होत्या. महिलांवर होणाºया अत्याचाराबाबत आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे. तसेच, हे प्रकार कमी व्हावेत म्हणून कडक कायदे अस्तित्वात आणण्यासाठी आंदोलने केली. मात्र, या कायद्यांची अंमलबजावणी करणारेच महिलांवर अत्याचार करीत आहेत. तर राज्यकर्ते व पोलीस त्यात सहभागी होताय. अस्मिेतेच्या राजकारणात महिलांचा बळी जात आहे, अशी भावना यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी व्यक्त केली. साधना दधिच, अंजली आंबेडकर, सुनीती सु. र., बेनझीर तांबोळी, स्त्रीवादी कार्यकर्त्या मेधा थत्ते, सुरेखा गाडे, विचारवंत अन्वर राजन, विलास, वर्षा गुप्ते, मयूरी, नसरीन तसेच मकबूल आणि रुक्साना पाटील या विद्यार्थ्यांनीदेखील यांनी आपले विचार मांडले. तर उपमहापौर
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मोर्चास पाठिंबा दिला.

आपकडूनही निषेध : जम्मूमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ भाजपा सरकारमधील काही लोकांनी काढलेला मोर्च्याच्या व उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव येथे भाजपा आमदार आणि त्याच्या साथीदारांनी एका मुलीवर केलेला अत्याचार व न्याय मागण्यासाठी पुढे आलेल्या तिच्या वडिलांचा पोलिसांकरवी केलेला खून या दोन्ही प्रकरणांचा निषेर्धात आम आदमी पक्षाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने करण्यात आली.

Web Title: Fierce anger against Kadua atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.