सिंगापूर येथे शेतीच्या वादातून तुंबळ मारामारी

By admin | Published: June 29, 2015 06:26 AM2015-06-29T06:26:00+5:302015-06-29T06:26:00+5:30

पुरंदर तालुक्यातील मौजे सिंगापूर येथे शेतीच्या कारणावरून मारामारी होऊन दोन जण जखमी झाले आहेत.

Fierce fighting in agrarian conflict at Singapore | सिंगापूर येथे शेतीच्या वादातून तुंबळ मारामारी

सिंगापूर येथे शेतीच्या वादातून तुंबळ मारामारी

Next

सासवड : पुरंदर तालुक्यातील मौजे सिंगापूर येथे शेतीच्या कारणावरून मारामारी होऊन दोन जण जखमी झाले आहेत.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिवाजी लवांडे यांचे सिंगापूर येथील शेतामध्ये पाईपलाईन केलेली असून त्यांच्या शेतात जाणाऱ्या पाईपलाईनच्या हुसासाचे झाकण कोणीतरी काढले. ते झाकण का काढले, म्हणून त्यांनी शिव्या देण्यास प्रारंभ केला.
तो आपल्यालाच शिव्या देत आहे, असे म्हणून तसेच पूर्वीपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू असल्याने तो वचपा काढण्यासाठी अनिकेत आबासाहेब लवांडे, प्रवीण भिवा लवांडे, आबा रामचंद्र लवांडे, विशाल शांताराम लवांडे, रामदास भिकोबा लवांडे, शंकर भिकोबा लवांडे या सर्वांनी मिळून शनिवार दि.२७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाघापूर चौफुला येथील अक्षय मंगल कार्यालयाजवळ गणेश लवांडे यास काठ्या, लोखंडी सळईने बेदम मारहाण व शिवीगाळ केली. या वेळी त्यांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या गणेश लवांडे याचा भाऊ संजय शिवाजी लवांडे यांनाही बेदम मारहाण केली.
(वार्ताहर)

Web Title: Fierce fighting in agrarian conflict at Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.