राजगुरूनगरमध्ये कपड्याच्या दुकानास भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 05:37 PM2021-07-07T17:37:24+5:302021-07-07T17:37:31+5:30
आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी प्रंचड गर्दी
राजगुरूनगर: राजगुरूनगर येथील सुप्रसिध्द संगम कापड दुकांनास आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.आगीचे कारण समजू शकले नाही.
राजगुरूनगर शहरात वाडारोडलगत संगम कपड्याचे दुकान आहे. दुकानाचे नुतुनीकरणाचे काम सुरू होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. २० मिनटांत आगीने रौद्ररूप धारण केले. राजगुरूनगर नगर परिषेदाचा अग्नीशमन बंब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याचे दुरवरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी प्रंचड गर्दी केली.
लॉकडाऊन असल्यामुळे इतर दुकाने बंद होती. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन बंब व पोलिस लागलीच पोहचले. बघ्यांची गर्दी व मोबाईलवर ती फोटो ,शुटीग करणारे उत्साही नागरिक यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. लॉक डाउन असताना केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतानाही प्रशासनाचे दुर्लक्षामुळे सर्व व्यवसाय सुरू असल्याने हि घटना घडल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.