वेल्हे येथील रुग्णांसाठी मुळशीत पंधरा बेड राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:01+5:302021-06-03T04:09:01+5:30
मार्गासनी: वेल्हे तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी मुळशी तालुक्यातील सूस येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृति कोविड केअर सेंटर येथे ...
मार्गासनी:
वेल्हे तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी मुळशी तालुक्यातील सूस येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृति कोविड केअर सेंटर येथे 10 आयसोलेशन बेड आणि ५ ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी दिली .
वेल्हे तालुक्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक चिरमोडी येथील सभागृहात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे बोलत होते. चांदेरे म्हणाले की वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी आहे या ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे दिसत आहे. तालुक्याला चांगले रुग्णालय होणे अपेक्षित आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहेत. त्यामुळे वेल्हे येथील रुग्णांसाठी पंधरा बेड राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील रुग्णांनी आवश्यक वाटल्यास तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे आणि सुनील शेंडकर यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले. उपस्थित नागरिकांना सनी टायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे यांनी लसीकरण ऑफलाईन झाले पाहिजे आणि आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख
बाळासाहेब चांदेरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिपक जगताप, तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे, संदिप आमले, दिपक दामगुडे, गणेश उफाळे, संतोष रेणुसे, सुशांत भोसले, अंकुश चोरगे, अक्षय वालगुडे, सुनील शेंडकर,
प्रभाकर रांजणे, मारुती सरपाले, शिवाजी जाध़व, ज्ञानेश्वर रांजणे, संजय राजपुरे, दिपक कडु, काळुराम महाले, कैलास गरुड, बाळासाहेब गरुड, किशोर उफाळे, किरण चोरघे उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गोपाळे यांनी केले तर आभार शैलेश वालगुडे यांनी मानले.
चिरमोडी (ता. वेल्हे) कोरोना परिस्थितीचा आढावा बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे व इतर.