एकाच कुटुंबातील 15 जण झाले काेराेनामुक्त ; 92 वर्षांच्या आजीचा देखील समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:42 PM2020-04-21T16:42:32+5:302020-04-21T16:43:40+5:30

पुण्यातील सिंबायाेसिस रुग्णालयातून 15 काेराेनातून मुक्त झालेल्या नागरिकांना घरी साेडण्यात आले.

Fifteen members of the same family were free from corona rsg | एकाच कुटुंबातील 15 जण झाले काेराेनामुक्त ; 92 वर्षांच्या आजीचा देखील समावेश

एकाच कुटुंबातील 15 जण झाले काेराेनामुक्त ; 92 वर्षांच्या आजीचा देखील समावेश

Next

पुणे:  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे आम्ही बरे झालो, अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली.

सिंबायाेसिस रुग्णालयात उपचारानंतर पुण्यातील एका कुटुंबातील 15 सदस्यांना घरी साेडण्यात आले. या सर्वांची काेराेनातून मुक्तता झाली. विशेष म्हणजे या कुटुंबातील तीन वर्षाची चिमुकली आणि 92 वर्षांच्या आजी देखील ठणठणीत बऱ्या झाल्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला. या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य भावना व्यक्त करताना म्हणाले, सुरुवातीला आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला. नंतर आम्ही त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले, पण कोणी दाखल करुन घेतले नाही. अखेर पुणे महानगरपालिकेच्या नायडू इस्पितळात नेले, मात्र त्यांनी ससून रुग्णालयात पाठविले, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले. व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. परंतु न्युमोनिया आजार असल्याने त्यांचे निधन झाले.

पुन्हा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आमचे कुटुंब व नातेवाईक मिळून जवळपास २० जणांना कोरोनाची बाधा झाली. सर्व जण घाबरलो,  २० पैकी ८ जण आम्ही एकाच कुटुबांतील होतो. आम्हाला लवळे येथील सिंबायोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. खरं तर फार चिंतेत होतो, अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झालं. पण सुदैवाने आम्ही बरे झालो. या १५ दिवसात तणाव होता, परंतु डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णालयातील सर्व सदस्य एवढ्या आपुलकीने वागत होते की, जणू काही आम्ही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहोत.  खूप आपुलकीची भावना निर्माण झाली या निमित्ताने नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की, घाबरु नका, पण काळजी घ्या. शासन आपल्यासाठी खूप काही करीत आहे.  सर्दी, ताप, खोकला झाल्यास बिनधास्त दवाखान्यात जा, उपचार करुन घ्या. कोरोनाची लागण झाली तरी हिमतीने सामोरे जा.आपल्यासाठी सर्व यंत्रणा राबते आहे. आपल्याला फक्त हिंमत द्यायची असते.

सिंबायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नटराजन म्हणाले, आमच्या लवळे येथील सिंबायोसिस रुग्णालयात १५५ रुग्ण दाखल आहेत. आज बरे होऊन घरी गेलेले १५ रुग्ण ८ एप्रिल २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १४ दिवस उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. ९२ वर्षाच्या आजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातील ३ वर्षांची मुलगी व एक पोलिओग्रस्त रुग्ण होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सिंम्बायोसिस रुग्णालय व भारती रुग्णालयाबरोबर करार केला असल्याची माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. भविष्यात रुग्ण वाढले तर तयारी असावी या हेतूने आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Fifteen members of the same family were free from corona rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.