सीबीएसईचे पंधरा हजार विद्यार्थी होणार उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:33+5:302021-06-03T04:09:33+5:30
गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांची संख्या पुण्यात वाढत चालली आहे. नीट, जेईईसारख्या प्रवेश पूर्वपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम महत्त्वाचा ...
गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांची संख्या पुण्यात वाढत चालली आहे. नीट, जेईईसारख्या प्रवेश पूर्वपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अनेक पालक राज्य मंडळाच्या शाळांना ऐवजी सीबीएसई बोर्डाच्या शाळांचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. परंतु, कोरोनामुळे सर्वच बोर्डाच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. इयत्ता दहावीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु, परीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करता येऊ शकले नाही, याबाबत काही विद्यार्थ्यांच्या मनात खंत आहे.
बारावीनंतर अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पर्याय स्वीकार करतात. त्यामुळे बारावीच्या गुणांना फारसे महत्त्व नसते. विद्यार्थ्यांना बारावीत विषय किती समजला हे परीक्षेतून कळते. त्यामुळे परीक्षा महत्त्वाच्या आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले देणे गरजेचे आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात होती.
-----------------
पुण्यात सीबीएससी बोर्डाच्या अंदाजे १५० शाळा असून त्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १५ हजार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व देशाच्या भवितव्याच्यादृष्टीने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत निरुत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. तसेच काहीही न करता आपण उत्तीर्ण होत आहोत असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात शाळेवर ते साठी घातक ठरणार आहे.
- गायत्री जाधव, प्राचार्य, प्रियदर्शनी स्कूल
-----------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दहावी पाठोपाठ बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यवर परिणाम होणार नाही.या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सामुदायिक जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे.
- रवींद्र सुरपे, कुकडी व्हॅली, शिक्षक