पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:20+5:302021-07-28T04:11:20+5:30
पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी २३ मे २०२१ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार होती.मात्र,राज्यातील सर्व ...
पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी २३ मे २०२१ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार होती.मात्र,राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने ८ ऑगस्ट २०२१ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. परंतु, राज्यातील काही जिल्ह्यात येत्या 8 ऑगस्ट रोजी केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट ऐवजी ९ ऑगस्ट २०२१ घेण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र २७ जुलै २०२१ रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तुकाराम सुपे यांनी केले आहे.