पुणे विद्यापीठात हाेणार पाचवे राज्यस्तरीय सामुदायिक रेडिअाे संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:58 PM2018-06-28T17:58:35+5:302018-06-28T17:59:46+5:30
राज्यातील कम्युनिटी रेडिअाे केंद्रांचे राज्यस्तरीय सामुदायिक रेडिअाे संमेलन पुणे विद्यापीठातील विद्यावाणी कम्युनिटी रेडिअाे केंद्रातर्फे अायाेजित करण्यात अाले अाहे.
पुणे : गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील विविध कम्युनिटी रेडिअाे केंद्राच्या लाेकांना एकत्र अाणत विविध विषयांवर चर्चा करुन कम्युनिटी रेडिअाेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या विद्यावाणी सामुदायिक रेडिअाे केंद्राकडून करण्यात येत अाहे. या केंद्राकडून सामुदायिक रेडिअाे संमेलन दरवर्षी भरविण्यात येत असून यंदा या संमेलनाचे पाचवे वर्ष अाहे.
यंदाच्या वर्षी हे संमेल 29 व 30 जून राेजी विद्यापीठातील कम्युनिकेशन विभागात संपन्न हाेणार अाहे. यंदाच्या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख, दूरदर्शनच्या मुख्य संपादीका ज्याेती अंबेकर, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त रवी पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जाेशी अादी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार अाहेत. त्याचबराेबर राज्यातील विविध कम्युनिटी रेडिअाे चालविताना येणाऱ्या अडचणी, नवीन कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तांत्रिक व अार्थिक अडचणी यांवर सखाेल चर्चा करण्यात येणार अाहे. तसेच या प्रश्नांवर चर्चेतून उत्तर शाेधण्याचाही प्रयत्न करण्यात येणार अाहे.
याबाबत बाेलताना विद्यावाणी कम्युनिटी रेडिअाे केंद्राचे संचालक, अानंद देशमुख म्हणाले, राज्यात 21 कम्युनिटी रेडिअाे केंद्र अाहेत. दरवर्षी या सर्व रेडिअाे केंद्रांचे राज्यस्तरीय संमेलन भरविण्यात येते. या संमेलनाच्या माध्यमातून कम्युनिटी रेडिअाे केंद्र चालविताना येणाऱ्या अार्थिक, तांत्रिक व इतर अडचणींवर चर्चा करण्यात येते. त्याचबराेबर त्या त्या विषयातील मान्यवरांचे मार्गदर्शन या संमेलनात अायाेजित करण्यात येते. या माध्यमातून अत्यंत उपयुक्त माहिती सर्वांपर्यत पाेहाेचायला मदत हाेते. सर्व कम्युनिटी रेडिअाे केंद्रांना एकत्र अाणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येताे.