शेतक-यांच्या खात्यात पावणेआठ कोटी जमा, पुणे जिल्ह्यात पंधराशेवर लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 03:21 AM2017-12-03T03:21:20+5:302017-12-03T03:21:33+5:30
कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १,४०० पात्र शेतकºयांच्या खात्यात ७ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची संख्या १,५२६ इतकी झाली आहे.
पुणे : कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १,४०० पात्र शेतकºयांच्या खात्यात ७ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची संख्या १,५२६ इतकी झाली आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी प्राप्त झाली आहे. त्यात ८ हजार ६१० कोटी रुपये बँकांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. त्यापैकी राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यावर २ हजार ७७० कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच, राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यावर ५ हजार ८४० कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये पुणे जिल्हा बँकेच्या खात्यात ७ कोटी ७४ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. या निधीचा फायदा जिल्ह्यातील
१ हजार ३७८ शेतकºयांना होईल. येत्या मंगळवारपर्यंत (दि. ५) ही रक्कम शेतकºयांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी माहिती सहकार आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
- छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या योजनेतील पात्र शेतक-यांच्या पहिल्या यादीत २६ शेतकºयांना १८ लाख ४१ हजार रुपये व पहिल्या यादीतील १२२ शेतक-यांना ६८ लाख ५९ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. यामुळे या योजनेचा फायदा मिळालेल्या शेतक-यांची संख्या १,५२६ झाली आहे.
- कर्जमाफीची रक्कम देण्यापूर्वी संबंधित शेतकºयांचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड
यांची तपासणी करण्यात येत आहे.