पुणे विभागातून पावणेसात लाख जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:20+5:302021-03-28T04:11:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे विभागातील ६ लाख ४५ हजार ६०३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे विभागातील ६ लाख ४५ हजार ६०३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७ लाख २४ हजार ६५४ झाली आहे. तर सक्रीय रुग्णसंख्या ६२ हजार ३५ इतकी आहे. कोरोनाबाधीतांचे एकुण मृत्यू १७ हजार झाले असून मृत्यूचे प्रमाण २.३५ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९.०९ टक्के आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण ४ लाख ९९ हजार ७८४ कोरोना रुग्णांपैकी ४ लाख ३७ हजार १८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रीय रुग्ण ५२ हजार ९३० आहेत. कोरोनाबाधित एकूण ९ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांचा पुणे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.९३ टक्के आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८७.४७ टक्के आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण ६३ हजार ७४३ कोरोना रुग्णांपैकी ५९ हजार १०५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रीय रुग्ण संख्या २ हजार ७५५ आहे. एकूण १ हजार ८८३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण ५८ हजार ९४७ कोरोना रुग्णांपैकी ५२ हजार ८६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रीय रुग्णसंख्या ४ हजार १६६ आहे. एकूण १ हजार ९१९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील एकूण ५० हजार ५४० कोरोना रुग्णांपैकी ४७ हजार २६० रुग्ण बरे होवून घरी गेले तर १ हजार ७८१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण ५१ हजार ६४० असून यातले ४९ हजार १९१ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. या जिल्ह्यातल्या १ हजार ७६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
पुणे विभागामध्ये एकुण ४७ लाख १४ हजार ३५८ नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी ७ लाख २४ हजार ६५४ नमून्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आहे.