पन्नास हजारांचा गुटखा पकडला, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:50+5:302021-04-14T04:10:50+5:30
स्वप्निल राजमल धोका (रा. मांडवगण फराटा ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ...
स्वप्निल राजमल धोका (रा. मांडवगण फराटा ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, १२ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथक शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत पाहिजे असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे मांडवगण फराटा गावात स्वप्निल राजमल धोका हा प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला सुगंधी तंबाखू, गुटखा याची बेकायदेशीररित्या साठवण करून विक्री करत आहे. त्यानुसार पथकाने पंचांना सोबत घेऊन मांडवगण फराटा येथे जाऊन स्वप्निल राजमल धोका याचे राहते घराची पंचासमक्ष घरझडती घेतली. त्यावेळी ५० हजार ३५० रूपये किमतीचा प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला सुगंधी तंबाखू, गुुटखाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवण केली असल्याचे दिसले. सापडलेला मुद्देमाल जप्त करून स्वप्निल धोका यास अटक करण्यात आली. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, उमाकांत कुंजीर, पोलीस नाईक राजू मोमिन , अजित भुजबळ, मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांनी केली.