वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाचपट दंड

By admin | Published: August 7, 2016 03:57 AM2016-08-07T03:57:29+5:302016-08-07T03:57:29+5:30

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाच ते दहापट दंड भरावा लागणार आहे.

Fifty times the penalty for violation of traffic rules | वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाचपट दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाचपट दंड

Next

बारामती : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाच ते दहापट दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीच्या मनमानीला त्यामुळे चाप बसणार आहे. ५ आॅगस्टपासूनच वाढीव दंड आकारणीला सुरुवात करण्यात आली आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय अकोलकर यांनी अधिक माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार : हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय हेल्मेट न घालता दुचाकीवर मागे बसणाऱ्यालादेखील दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. विनाहेल्मेट प्रवास केल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. कलम १७७ च्या मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकास यापूर्वी केवळ १०० रुपये दंड आकारणी करण्यात येत होती. आता मात्र दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यास दुचाकीस्वारासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलादेखील पाचपट दंड भरावा लागणार आहे. मात्र, वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, वाहनांना टेललाईट नसणे, फ ॅन्सी नंबर प्लेट वापर केल्याप्रकरणी यापूर्वी कलम १७७ अंतर्गत यापूर्वी केवळ १०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता हा दंड दहापट म्हणजे १००० रुपये भरावा लागणार आहे. लायसन नसणाऱ्या व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे, लायसनशिवाय वाहन चालविल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी हा दंड ३०० रुपये होता. विहीत वेगमर्यादेहून अधिक वेगाने वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्यासाठी १००० दंड केला आहे. हा दंड अनुक्रमे ४०० आणि ६०० रुपये होता. तसेच, विनानोंदणी दुचाकीशिवाय इतर वाहन चालविल्यास मालक आणि चालकालादेखील दुप्पट दंड २००० हजार रुपये भरावा लागेल. विमा प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे चालकासाठी जैसे थे ३०० रुपयेच ठेवण्यात आला आहे. मात्र, विमा प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविल्यास सहापटहून अधिक २००० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी हा दंड ३०० रुपये होता.

मीटर पडताळणीचे काम पुन्हा परिवहन विभागाकडे...
आॅटो रिक्षा आणि टॅक्सी मीटरच्या पडताळणीचे काम पूर्वीप्रमाणेच परिवहन विभागाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. मीटरच्या पडताळणीबाबत पुणे येथील मे स्टँडर्ड मीटर मॅन्यु. कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकेमध्ये वैधमापनशास्त्र यंत्रणेकडे असलेल्या साधनसामग्रीचा अभाव, त्यामुळे शासनाकडे मिळालेल्या तक्रारी विचारात घेऊन तपासणी पूर्ववत परिवहन विभागाकडे सोपाविण्यात आली आहे, अशी माहिती बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिली.

Web Title: Fifty times the penalty for violation of traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.