उरुळी कांचनची पन्नास वर्षांपासूनची परंपरा आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:49+5:302021-01-17T04:10:49+5:30
. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होऊन नंतर एकत्रितपणे चहापान घेऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाण्याची प्रथा कै.डॉ.मणिभाई देसाई, कै. दतोबा कांचन, ...
. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होऊन नंतर एकत्रितपणे चहापान घेऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाण्याची प्रथा कै.डॉ.मणिभाई देसाई, कै. दतोबा कांचन, कै.गीतारामबुवा कांचन, कै.भक्तावरशेठ भन्साळी,कै. पन्नालालजी बलदोटा, कै.नामदेवराव कांचन, कै. सुभाष कांचन (पाटील ) आदींनी सुरु केली ती आजही कायम आहे. हे या गावाचे एक वेगळेपण हवेली तालुक्यात आगळे वेगळे असेच आहे.
काल पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतदाना नंतरही पार पाडण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा.के.डी. कांचन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेवराव कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, कै. सुभाष कांचन (पाटील ) गटाचे सुनील कांचन आदी गटनेत्यांसहित त्यांचे सर्व कार्यकर्ते व समर्थक मतदार बंधू उपस्थित होते. त्यांनी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण पाडताना एकमेकांच्या विरुद्ध अतिशय जोमाने, जोशाने, चुरशीने प्रचार करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे व प्रभावित करण्याचे काम पार पाडले असतानाही, सायंकाळी ५.३० वा संपलेल्या मतदानानंतर मात्र कोणताही किंतू किंवा आकस मनामध्ये न ठेवता सर्वजण एकत्र येऊन शांततेत मतदान पार पाडल्याबद्दल एकमेकांचे आभार व्यक्त केले.