Pune | सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेसाठी भांडण, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 07:09 PM2023-04-21T19:09:25+5:302023-04-21T19:11:35+5:30
पास धारकांना दोन बोगी देण्याची मागणी...
पिंपरी : लॉकडाऊनपूर्वी सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या १९ होती. लॉकडाऊननंतर ती १६ करण्यात आली. डब्यांची संख्या कमी झाल्याने तब्बल ३००-३२५ सीट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे बसायला जाग मिळत नसल्याने सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये भांडणे होत आहे. असा एक भांडणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
यामधील पुरुष प्रवासी महिलेशी असभ्य भाषेत भांडणात दिसून येत आहे. रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी सांगितले की, सिंहगडने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तसेच पासधारकांची संख्या अधिक आहे. मात्र, पुर्वीपेक्षा एक्सप्रेसच्या डब्बांची संख्या कमी केल्याने प्रवाशांना बसायला देखील जागा मिळत नाही. या विषयी आम्ही वारंवार निवेदन रेल्वे प्रशासनाला दिले. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी करून वस्तुस्थिती पाहिली. तरी देखील डब्ब्यांची संख्या वाढली नाही.
१५ दिवसांत चार भांडणे
सिंहगड एक्सप्रेसमध्ये फक्त जागेच्या कारणावरून मागील १५ दिवसांत चार भांडणे झाली जी आरपीएफपर्यंत पोहचली. आरपीएफने देखील कारवाई करत संबधितांना समज दिली. मात्र, अशी प्रकरणे जागेच्या अभावी घडतच राहणार, असे एका महिला प्रवाशानी सांगितले.
Pune | सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेसाठी भांडण, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल; डब्बे वाढवण्याची आवश्यकता#Punepic.twitter.com/Rv6tLNRMUG
— Lokmat (@lokmat) April 21, 2023
पास धारकांना दोन बोगी देण्याची मागणी
पासधारकांसाठी लॉकडाऊन आधी दोन बोगी दिल्या जात होत्या. मात्र, त्या आता दिल्या जात नाही. त्यामुळे पुर्वी प्रमाणे पासधारकांना दोन बोगी देण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून केली जात आहे.
जागेअभावी प्रवाशांमध्ये भांडण होत आहेत. त्यामुळे रेल्वेप्रशासनाने पुर्वीप्रमाणे डब्ब्यांची संख्या वाढवावी. पासधारकांसाठीच्या बोगी पुर्वीप्रमाणे सुरु करावी, अशी आमची मागणी आहे.
- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ