Pune Crime| सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन पुण्यात दोन गटात राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 08:30 PM2022-08-16T20:30:14+5:302022-08-16T20:35:01+5:30

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक...

Fight in two groups in Pune over cigarettes, water bottles Pune Crime news | Pune Crime| सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन पुण्यात दोन गटात राडा

Pune Crime| सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन पुण्यात दोन गटात राडा

Next

पुणे : सिगारेट व पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादात दोन गटाने परस्परांना मारहाण करुन राडा घातला. तसेच तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत स्वप्निल दत्तू कांबळे (वय २३, रा. विश्वदीप तरुण मंडळापाठीमागे, ताडीवाला रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नौशाद शेख (वय ३३), हुसेन खान (वय २१), वसीम सय्यद (वय ३०), कासीम शेख (वय १९, सर्व रा. ताडीवाला रोड) यांना अटक केली आहे. हा प्रकार ससून रोडवरील जहागीर हॉस्पिटल समोरील मंजूर पान शॉप येथे सोमवारी मध्यरात्री १२ ते पहाटे पावणेतीनच्या दरम्यान घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नौशाद शेख याचे मंजूर पान शॉप आहे. स्वप्निल कांबळे हा मित्रासह सिगारेट व पाण्याची बाटली घेण्यासाठी या पान शॉपवर गेला होता. त्यावेळी सिगारेट व पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून त्यांच्यात वाद झाले. तेव्हा त्यांनी मारहाण केल्याने फिर्यादी यांच्या दुचाकीची चावी तेथेच पडली. तेव्हा तो घाबरुन विना चावीची दुचाकी घेऊन निघून गेला. त्यानंतर तो मित्रांना घेऊन पहाटे पावणेतीन वाजता आला. तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करुन तू पुन्हा येथे आला असे म्हणून फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.

याविरोधात वसीम हाजी मलंग सय्यद (वय ३०, रा. प्रायव्हेट रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील कांबळे, निलेश धनगर, कुमार कोळी (सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नौशाद शेख, हुसेन खान व कासीम शेख हे मंजूर पान शॉपवर असताना आरोपी तेथे येऊन फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या डोक्यात रिकाम्या बिअरच्या बाटल्या मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक गोरड तपास करीत आहेत.

Web Title: Fight in two groups in Pune over cigarettes, water bottles Pune Crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.