पुण्यातील दौंडमध्ये माथेफिरूचा बेछूट गोळीबार; तिघांचा मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:36 IST2018-01-16T14:45:25+5:302018-01-17T04:36:40+5:30
शहरात एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. नगरमोरी चौकात दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. बोरावके नगर येथेही गोळीबार झाल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.

पुण्यातील दौंडमध्ये माथेफिरूचा बेछूट गोळीबार; तिघांचा मृत्यू, एक जखमी
दौंड : शहरात एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. नगरमोरी चौकात दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. बोरावके नगर येथेही गोळीबार झाल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.
पैशाच्या व्यवहारावरून हा प्रकार घडल्याचे बोलले जात होते. संजय शिंदे असे या माथेफिरुचे नाव असून इंडियन रिझर्व बटालियनमध्ये दारूगोळा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सध्या तो दौंड येथे सेवेस आहे. नगर मोदी चौकात दुपारी १.३०च्या सुमारास संजय शिंदेची दोघाबरोबर बाचाबाची झाली. तेथील लोकांनी ती सोडवली. तेव्हा जाताना अचानक पिस्तुल काढले व गोळीबार करण्यास सुरुवात केली. एकाच्या डोक्यात गोळी घुसली. दोघांचा मृत्यू झाला.
शहराच्या बोरावकेनगर येथेही त्याने गोळीबार केल्याचे समजते. यात एकाचा मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. हल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
घटनेनंतर एका घरात तो शस्त्रास्त्रासह लपून बसला असून पोलिसांनी घराला घेराव घातला आहे. तर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे.